
परंडा शिक्षण कार्यालयाला माहिती न देणे पडले महागात; राज्य माहिती आयोगाचा ५ हजारांचा दणका, शिक्षण खात्यात खळबळ.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- माहिती अधिकार कायद्यांतर्गत वेळेत आणि आदेश देऊनही माहिती न देणे परंडा येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या जन माहि ती अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे.
- राज्य माहिती आयोग खंडपीठाने या प्रकरणी जन माहिती अधिकाऱ्याला ५ हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला असून तातडीने माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
- या धडक कारवाईमुळे परंडा तालुक्यासह जिल्ह्यातील शि क्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

- याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, परंडा तालु क्यातील विजय भानुदास मेहेर यांनी गटशिक्षण कार्याल य, परंडा येथे माहिती अधिकारांतर्गत काही महत्त्वपूर्ण माहितीची मागणी केली होती.
- मात्र, प्रशासनाकडून ही माहिती निर्धारित वेळेत देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
- माहिती मिळत नसल्याचे पाहून विजय मेहेर यांनी निय मानुसार प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांकडे प्रथम अपील दाखल केले होते.
- प्रथम अपीलावर सुनावणी होऊन संबंधितांना माहिती देण्याचे स्पष्ट आदेश जारी करण्यात आले होते.
- तरी देखील परंडा गटशिक्षण कार्यालयाच्या जन माहिती अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत मा हिती देण्यास स्पष्ट नकार दिला.
- प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे मेहर यांनी थेट माननीय राज्य माहिती आयोग खंडपीठाकडे धाव घेऊन द्वितीय अपील दाखल केले.
- राज्य माहिती आयोग खंडपीठासमोर या प्रकरणाची सवि स्तर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि पुराव्यां चे अवलोकन केल्यानंतर खंडपीठाने परंडा गटशिक्षण कार्यालयाच्या जन माहिती अधिकाऱ्याचा निष्काळजी पणा आणि कायद्याचे उल्लंघन गंभीर मानले.
- त्यानुसार खंडपीठाने दी .12/112025 जन माहिती अ धिकाऱ्याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला, तसेच अर्ज दाराला तात्काळ माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
- विजय मेहेर यांनी प्रशासकीय दिरंगाईविरोधात चिकाटीने आणि कायदेशीर मार्गाने केलेल्या या यशस्वी पाठपुराव्या मुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले आहे.
- मेहेर यांच्या या यशाबद्दल सध्या सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






