
परंडा कुऱ्हाड गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक कुसुम देविदास डाके यांचे निधन; दर्गाह रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- शहरातील कुऱ्हाड गल्ली येथील रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिक कुसुम देवि दास डाके (वय ८१) यांचे आज गुरुवारी सकाळी ९:३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने डाके परिवारासह परंडा शहरात शोककळा पसरली आहे.
- दुपारी ४ वाजता दर्गाह रस्त्याजवळील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आले.
- कुसुम डाके या कल्याणसागर बँकेचे कर्मचारी जगदीश डाके, पत्रकार किरण डाके आणि नरेश डाके यांच्या मा तोश्री होत.

- या अंत्ययात्रेला परंडा शहरासह परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि व्यापारी क्षेत्राती ल नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
- सर्वांनी डाके परिवाराचे सांत्वन करत दिवंगत कुसुम डाके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात ती न मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






