जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा रायपाटण नं.१ च्या मुख्याध्यापिका सौ.नीलम थरवळ निवृत्त.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- जि.प.पूर्ण प्राथमि क केंद्रशाळा रायपाटण नं.१ च्या मुख्याध्यापिका सौ.नील म थरवळ नियत वयोमानानुसार ३१ मे २०२५ रोजी सेवा निवृत्त झाल्या.
  • त्यानिमित्त त्यांचा शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भावी आयु ष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
  • रायपाटण मधील गेल्या दोन वर्षाच्या सेवेत त्यांनी विद्या र्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले.
  • त्यामुळे दोन्ही वर्षी त्यांचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षेतही यश मिळवू शकले. त्यामुळे शाळेचे व गावचे नाव जिल्ह्यामध्ये झाले.
  • यावर्षी दोन विद्यार्थ्यांची नवोदयला निवड झाली तर सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे.
  • बाईंच्यामुळे शाळेची व विद्यार्थ्यांची प्रगती झाली असे उद्गार सर्वच मान्यवरांनी काढले.
  • या कार्यक्रमाला पाचल बीटचे विस्तार अधिकारी बंडगर, जिजामाता विद्यामंदिर रायपाटणचे माजी मुख्याध्यापक विनोद करंदीकर, प्रभारी केंद्रप्रमुख अनाजी मासये, कोळं ब शाळा मुख्याध्यापक जयेश तेलंग, जिजामाता विद्यामं दिर रायपाटण प्र.मुख्याध्यापक दामोदर लिंगायत, रायपाट णचे माजी सरपंच संदीप कोलते, व्यवस्थापन समिती शा ळा रायपाटण नंबर १ चे अध्यक्ष किशोर गुरव, ग्रामपंचाय त सदस्य प्रिती नमसे, व्यवस्थापन समिती सदस्य विनाय क निखांर्गे, गोपिनाथ नवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
  • पालक, ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी उत्तम सहकार्य केले त्याबद्दल मी आपली ऋणी आहे.
  • सर्वांच्या सहकार्यामुळेच विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊ शकले असे सौ. नीलम थरवळ यांनी सांगितले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles