
राजापूर तालुकास्तरीय कबड्डी पंच शिबीर उत्साहात संपन्न.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे घेण्यात येणाऱ्या जिल्हा कबड्डी पंच परीक्षेचे औचित्य साधून राजापूर तालुका कबड्डी अ सोसिएशन मार्फत जिल्हा पंच परीक्षेला बसणाऱ्या सर्व परीक्षार्थीचे व सर्व जिल्हा व राज्य पंचांचे एक दिवशीय पंच शिबीर धर्मशाळा राजापूर या ठिकाणी संपन्न झाले.

- यावेळी राजापूर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्री.राजू दिवटे, सचिव मा.श्री.प्रवीण बाणे, पंचप्रमुख मा.श्री.दत्ता गायकवाड, राज्य पंच मा.श्री.संदीप पवार,मा. श्री.दादासो ठोंबरे, मा.श्री.सचिन नाचणेकर, अर्बन बँकेचे माजी संचालक मा.श्री.सुनील जाधव साहेब, तायकोंदो प्र शिक्षक मा.श्री.महेश नाचरे तसेच इतर मान्यवर व परीक्षा र्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- पंचप्रमुख दत्ता गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत करत परी क्षेचे स्वरूप, प्रश्नाचे स्वरूप, नियमांची उजळणी,मैदान आ खणी, मैदान मापे, स्कोअर शीट भरणे, लॉट्स टाकणे, नि र्णय देतानाच्या व्हिसलिंग याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
- त्यांना संदीप पवार यांनी मोलाची साथ केली. शिबिरा बा बत सर्व परीक्षार्थिनी समाधान व्यक्त करत असोसिएशनचे आभार मानले.
- शेवटी तालुका सचिव श्री.बाणे सर यांनी सर्वांचे शिबिरा ला उपस्थित राहून शिबीर यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आ भार मानून शिबिराची सांगता करण्यात आली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











