विज पडून दोन जनावरे ठार,बैलजोडी गंभीर जखमी : शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे :- संततधार पावसामुळे जि ल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असताना, आकपुरी शिवारात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत विजेचा मोठा फट का शेतकऱ्याला बसला आहे.
  • दिनांक २६ जुलै रोजी मध्यरात्री मुसळधार पावसासोबत जोरदार वीज पडल्याने शेतकरी अनंता रामचंद्र चव्हाण यांच्या गोठ्यावर वीज कोसळले.
  • या घटनेत एक गाय आणि एक वासरू जागीच ठार झाले, तर गोठ्यातील बैलजोडी गंभीर जखमी झाली आहे.
  • शेतकऱ्याच्या गोठ्यात ठेवलेले कुटार, रासायनिक खते, त सेच इतर शेतीसाहित्य पूर्णपणे खाक झाले असून, एकूण अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
  • सकाळी शेतात गेलेल्या अनंता चव्हाण यांच्या लक्षात ही घटना आली. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि वडगाव पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली.
  • घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस आणि आकपु री येथील तलाठी यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
  • मृत जनावरांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टेम करण्यात आले असून, गंभीर जखमी बैलजो डीवर उपचार सुरू आहेत.
  • या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानाची भरपाई शा सनाने द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी अनंता चव्हाण यांनी केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles