महामार्गावर वाकेड लक्ष्मीबाग येथे रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

  • प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौजे वाकेड लक्ष्मीबाग येथे मुंबई गोवा महामार्गावर रस्ता ओ लांडणाऱ्या बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना मंगळवार २३ सप्टेंबर रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
  • मुंबई गोवा महामार्गावर वाकेड लक्ष्मीबाग या ठिकाणी मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक बसली.
  • यामध्ये त्याचा जबडा तुटला असून डोके,मान तसेच तोंडा ला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला अशी माहि ती वनविभाग लांजाचे वनपाल सारिक फकीर यांनी दिली.
  • हा मृत बिबट्या नर जातीचा असून तो अंदाजे एक ते दिड वर्षांचा असल्याचे त्यांनी सांगितले.
  • मृत्यू झालेल्या या बिबट्याचे वनविभागाच्या भांबेड येथील रोपवाटिकेमध्ये तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करण्यात आले.
  • त्यानंतर या बिबट्याचे दहन करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
  • रात्रीच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला असल्याचा अंदाज देखील वनविभागाकडून वर्तवि ण्यात आला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles