बावची विद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ज्ञान प्रदशन चे उदघाटन पराड्यांचे गटविकास अधिकारी विनोद जाधव यांच्या हास्ते करण्यात आले.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परांडा: बावची विद्यालय, परंडा येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
  • हा दिवस महान भारतीय शास्त्रज्ञ C. V. Raman यांनी लावलेल्या Raman Effect या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
  • या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मा.श्री.विनोद जाधव साहेब गट विकास अधिकारी, पंचायत समिती परंडा यांच्या हस्ते करण्यात आले.
  • यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वैज्ञानि क प्रयोगांची प्रत्यक्ष पाहणी केली.
  • प्रत्येक प्रकल्पाजवळ थांबून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी प्रयोगामागील संकल्पना समजून घेतल्या व अनेक प्रश्न विचारत विद्यार्थ्यांसोबत मनमोकळेपणाने वैज्ञानिक चर्चा केली.
  • आपल्या मनोगतात जाधव साहेबांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानि क दृष्टिकोन ठेवून अभ्यास करण्याचे महत्त्व पटवून दिले.
  • स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वतःच्या अनुभवांवर आ धारित मार्गदर्शन करत त्यांनी विद्यार्थ्यांना जिद्द,चिकाटी व परिश्रम यांच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, असा संदे श दिला.
  • गट विकास अधिकारी मा.श्री.विनोद जाधव साहेब हे अत्यंत अभ्यासू, दूरदृष्टी असलेले व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.
  • प्रशासनातील कामकाजाबरोबरच विद्यार्थ्यांशी संवाद सा धून त्यांना प्रोत्साहन देण्याची त्यांची शैली विशेष उल्लेख नीय आहे.
  • या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात विज्ञान विष याचे अध्यापन करणारे शिक्षक सचिन मोरे, प्रमोद डोके, पुजा रोडगे, संभाजी खैरे, सौ.गरड, आर.आर.शुभम रोडगे, सौ.गोडगे, पी.जी.सौ.शिवानी पाटेकर, सौ.गाडे पी. एम, या सर्व शिक्षकांच मा.गट विकास अधिकारी, पंचायत समिती परंडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
  • यावेळी त्यांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे तसेच विद्यालयातील भौतिक सुवि धा, शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा उत्साह यांचे कौतुक केले.
  • कार्यक्रमास विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष-मा.श्री. बिभि षण रोडगे सर, मुख्याध्यापक-श्री.नारायण खैरे सर व इतर शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण होऊन संशोधनाची आवड वाढण्यास मोठी चाल ना मिळाली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles