मॉडर्न हायस्कूलचे भूगोल प्रज्ञाशोध परीकक्षेतील यश.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलने भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
  • भूगोल अभ्यास व परीक्षा केंद्र नेरूळ नवी मुंबई यांच्यात र्फे दरवर्षी राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येत असते.
  • या स्पर्धेत प्रशालेतील इयत्ता आठवी मधील कु.बिरादार तृप्ती अंगद या विद्यार्थिनीने १०० पैकी ९८ गुण मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले.
  • तर इयत्ता दहावी मधील कु.मेस्त्री समृद्धी बाजीराव या विद्यार्थिनीने १०० पैकी ९६ गुण मिळवून सिल्व्हर मेडल प्राप्त केले.
  •  तसेच इयत्ता नववी मधील चि. दन्ने ओंकार बालाजी या विद्यार्थ्याने १०० पैकी ९२ गुण मिळवून ब्राझ मेडल प्राप्त केले.
  • मॉडर्न शाळेतील शिक्षिका खेडेकर सुनंदा सुदाम यांना उपक्रमशील भूगोल शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रमाणपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • यावेळी मुख्याध्यापक प्रकाश पाबळे सरांना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
  • यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.ग जानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्य वाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदि ता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंखे, व्हिजिटर प्रमोद शिंदे मुख्याध्यापक प्रकाश पाबळे, पर्यवे क्षक विजय पाचारणे,राजीव कुटे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles