
कोंडतिवरे गावातील कु.अभिजित बाणे बनले डॉक्टर.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौ जे कोंडतिवरे हे गाव पूर्व पट्ट्यातील दुर्गम भागात वसले आहे. दोन तीन वाड्याचे हे गाव असून गावातील बहुतांश लोक नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झालेले आहेत.
- या गावातील कातळवाडीतील सुपुत्र कु. अभिजित बाळ कृष्ण बाणे हे बी.ए.एम.एस (BAMS) ही पदवी मिळवून डॉक्टर झाले आहेत.

- मुंबईतील वरळी येथील आर.ए. पोद्दार आयुर्वेदिक वैद्यकी य महाविद्यालयातून त्यांनी ही डिग्री मिळवली आहे.
- अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती वडील बाळकृष्ण पां डुरंग बाणे हे अर्धांग वायू झाल्याने घरी असतात तर आई स्वाती बाणे या गृहिणी असून त्यांनी धुणीभांडी करुन त्याला शिक्षण दिले आहे.
- परंतु जन्मजात हुशारी आणि कष्ट करण्याची तयारी याच जोरावर त्याने पदवी प्राप्त करत बाणे घराण्याचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
- याआधी याच घरातील दत्ताराम बाणे यांच्या रुपाने एक गावाच्या विकासासाठी वाहून घेतलेला समाजसेवक ज न्माला आला आणि आता अभिजित बाणे यांनी आपल्या काकांचा वारसा पुढे नेत डॉक्टर ही पदवी मिळवून आप ल्या बाणे घराण्याचे नाव रोशन केले आहे.
- त्यांच्या या निस्सीम यशाचे सर्वत्र कौतुक होत असून नव युवक तरुण मित्र मंडळ (कातळवाडी) यांनी त्याचे अभि नंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











