
मनरेगा अंतर्गत गायगोठ्यांचे बिल तीन वर्षांपासून रखडले; परंडा तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात…! प्रशासकीय उदासीनतेमुळे तीव्र नाराजी; गट विकास अधिकारी लक्ष देतील का…?
- प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :-परंडा तालुक्यात म हात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाव ण्यासाठी आणि पशुपालनाला चालना देण्यासाठी ‘गायगो ठा’ योजना सुरू करण्यात आली.
- मात्र, परंडा तालुक्यात सध्या या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
- हक्काचे पैसे खर्च करून आणि पदरचे कर्ज काढून शेतक ऱ्यांनी गायगोठे बांधून पूर्ण केले खरे, परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या तीन वर्षांपासून या गायगो ठ्यांचे देयक (बिल) रखडले आहे.

- आधीच अस्मानी संकटाने होरपळलेला शेतकरी आता या शासकीय थकबाकीमुळे पुरता खचला असून, शेतकरी व र्गात प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
- आता याकडे परंडा तालुक्याचे गट विकास अधिकारी (बी डीओ) गांभीर्याने लक्ष देणार का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
- निसर्गाचा दुहेरी फटका आणि आर्थिक कोंडी
- गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातों डाशी आलेला घास हिरावला गेला होता.
- त्यातून शेतकरी सावरत नाही तोच, यंदा पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण परंडा परिसरात भीषण दुष्काळी परि स्थिती निर्माण झाली आहे.
- एकीकडे पिकांचे झालेले अतोनात नुकसान आणि दुसरी कडे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
- या कठीण परिस्थितीत मनरेगाच्या गायगोठ्याचे थकीत बिल मिळाले असते, तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधा र मिळाला असता. मात्र, तब्बल तीन वर्षे उलटूनही हक्का ची रक्कम बँक खात्यात जमा झालेली नाही.
- शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ
- शासकीय अनुदान वेळेत मिळेल या आशेने तालुक्यातील अनेक अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांनी उसने-पासने क रून, तर काहींनी खाजगी सावकाराकडून चढ्या व्याजाने कर्ज काढून गायगोठ्यांचे बांधकाम पूर्ण केले.
- योजनेच्या नियमानुसार काम पूर्ण झाल्यावर तातडीने बि ल मिळणे अपेक्षित होते. मात्र, महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या दिरंगाई व उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना वारंवा र शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
- “काम पूर्ण होऊन तीन वर्षे झाली, तरीही पैसे मिळत नस तील, तर अशा शासकीय योजनांचा फायदा काय?” असा संतप्त सवाल लाभार्थी शेतकरी विचारत आहेत.
- तीव्र आंदोलनाचा इशारा
- दुष्काळाच्या छायेत असलेल्या परंडा तालुक्यातील शेतक ऱ्यांना आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा आणि ज नावरे कशी जगवावीत, असा यक्षप्रश्न पडला आहे.

- तालुक्यातील प्रशासनाने या गंभीर बाबीची त्वरित दखल घेऊन रखडलेली गायगोठ्यांची बिले तात्काळ जमा करा वीत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
- येत्या काही दिवसांत थकीत देयके न मिळाल्यास प्रशास नाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बाधित शेत करी वर्गातून दिला जात आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/





