मॉडर्न हायस्कुलमध्ये पारंपरिक भोंडला उत्साहात संपन्न; विद्यार्थिनींनी धरला फेर….!

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- येथील मॉडर्न हायस्कुलमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून पारंपरिक संस्कृ तीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘भोंडला’ कार्य क्रमाचे अतिशय उत्साही आणि मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
  • या कार्यक्रमामुळे शाळेच्या प्रांगणात पारंपरिक लोकसंस्कृ तीचा आनंददायी साद पडल्याचे पाहायला मिळाले. कार्य क्रमाची सुरुवात श्री देवीच्या प्रतिमा पूजनाने व आरतीने झाली.
  • यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सोनोने, सुलभा उ बाळे, अर्चना कारंडे, सपना साने, सुनीता मोरे तसेच शाळा व्यवस्थापन आणि पालक संघाच्या सर्व महिला प्रतिनिधीं नी भावपूर्ण वातावरणात देवीचे पूजन केले.
  • पूजनानंतर घटस्थापनेचे औचित्य साधत उपस्थित महिला शिक्षक, पालक व विद्यार्थिनींनी पारंपरिक भोंडल्याची गा णी गात अतिशय आनंदात फेर धरला.
  • या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नगरसेव क विकास साने यांनी विद्यार्थिनींशी मनमोकळा संवाद साधला.
  • आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, “आजच्या काळात मु लींनी केवळ अभ्यासातच नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेतली पाहिजे.
  • विद्यार्थिनींनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन स्वतःला सक्षम बनवावे आणि देशाची एक सशक्त व आदर्श नारी बनून दाखवावे.” कार्यक्रमाची नेटकी आखणी आणि नियोजन करण्यात आले होते.
  • या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन जयश्री चव्हाण यांनी के ले, तर कार्यक्रमास उपस्थित लाभलेल्या पाहुण्यांचा परिच य शिवाजी अंबिके व आशा कुंजीर यांनी करून दिला.
  • हा सांस्कृतिक उपक्रम अत्यंत यशस्वी रीतीने पार पाडण्या साठी सुनंदा खेडेकर,साधना राऊत,उमा बिर्जे,मनीषा बोत्रे,वैशाली देसले,गौरी देशपांडे,अमृता गायकवाड,स्मिता कपटकर,वृषाली सलगर आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles