राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्थेच्या शाखाविस्ताराला गती ; ठाणे व पालघर जिल्ह्यांत कार्यक्षेत्र विस्तारास मंजुरी. 

  • प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- राजापूर सन्मित्र सह कारी पतसंस्था मुंबई मर्यादित या संस्थेच्या विस्ताराच्या दृष्टी ने महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.
  • ठाणे व पालघर जिल्ह्यांत कार्यक्षेत्र विस्तारासाठी मंजुरी मिळाली असून, लवकरच दिवा (जि. ठाणे) आणि विरार (जि. पालघर) येथे दोन नवीन शाखा सुरू करण्यात येणार.
  • त्यामुळे मुंबईबाहेर वास्तव्यास असलेल्या सभासदांना सं स्थेच्या सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध होणार आहेत.
  • संस्थेच्या ३८ वर्षांच्या यशस्वी वाटचालीतील हा एक मह त्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा मानला जात आहे.
  • गेल्या ३८ वर्षांपासून एक मुख्य कार्यालय आणि एक शा खा यांच्या माध्यमातून सभासदांना सेवा देणाऱ्या या संस्थे चा शाखाविस्ताराचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.
  • मात्र, एप्रिल २०२५ मध्ये कार्यभार स्वीकारलेल्या नवीन सं चालक मंडळाने या विषयाला प्राधान्य देत शाखाविस्तारा साठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले.
  • प्रयत्नांना यश मिळाल्याने आता संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.मधुकर भिवा तोरस्कर आणि उपा ध्यक्ष मा.श्री.परशुराम जयराम परवडे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने शाखाविस्तारासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले.
  • त्यांच्या प्रयत्नांना मिळालेले यश संस्थेच्या भावी प्रगती च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
  • दिवा आणि विरार येथे नवीन शाखा सुरू झाल्यानंतर या परिसरातील सभासदांना संस्थेच्या सहकारी आर्थिक से वांचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार.
  • तसेच, नवीन सभासद जोडण्यासह संस्थेच्या सभासदसं ख्येत वाढ होण्यास आणि कार्यक्षेत्र अधिक व्यापक हो ण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
  • ठाणे व पालघर जिल्ह्यांतील विस्तारानंतर आगामी काळा त कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातही संस्थेचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा मानस संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.
  • त्यामुळे भविष्यात कोकणातील अधिकाधिक सभासदां पर्यंत संस्थेच्या सेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
  • या महत्त्वपूर्ण यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळाचे सदस्य तसेच संस्थेला मार्गदर्शन कर णाऱ्या सल्लागारांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
  • सभासदांचा विश्वास, सहकार्याची भावना आणि संस्थेच्या प्रगतीसाठी करण्यात आलेले सामूहिक प्रयत्न यांमुळेच हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठता आला, अशी भावना व्यक्त होत आहे.
  • ३८ वर्षांच्या विश्वासपूर्ण वाटचालीनंतर राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्थेने शाखाविस्ताराच्या माध्यमातून प्रगती च्या नव्या दिशेने पाऊल टाकले आहे.
  • आणि विरार येथील नवीन शाखांमुळे संस्थेच्या विकासा ला चालना मिळणार असून, भविष्यात रत्नागिरी जिल्ह्या तही विस्तार करण्याच्या उद्दिष्टातून संस्था सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles