ग्रामपंचायत खरवतेच्या जलसंधारणाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसादग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा. 

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील ग्राम पंचायत खरवतेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत दि. १५ ऑक्टोबर रोजी वनराई बंधारा बांधून जलसंधारण मोहिम यशस्वी केली आहे
  • एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे भविष्यात उद्भवू शक णाऱ्या पाणीटंचाईच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आज आपण एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
  • राजापूर तालुक्यात भविष्यात पाणीटंचाईची गंभीर परि स्थिती निर्माण होऊ नये, सध्या वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरावे, भूगर्भातील पाणीसाठ्या त वाढ व्हावी आणि दुष्काळी परिस्थितीशी दोन हात कर ण्यासाठी गावाची पाणी सुरक्षितता बळकट व्हावी, या उद्दे शाने आपण सर्वांनी एकत्र येत वनराई बंधारे बांधण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले.
  • या लोकसहभागाच्या उपक्रमात सहभागी झालेले सर्व ग्रामस्थ, पोलिस पाटील मॅडम, बचत गटातील सर्व महि ला, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शालेय विद्यार्थी आणि ग्रामपंचा यतीची संपूर्ण टीम या सर्वांचे विशेष आभार आणि कौतु क केले आहे.
  • कोंडवाडी व मधली वाडी येथील ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने वनराई बंधारे बांधण्याची जी तयारी दर्शवली आहे, ती खरोखरच प्रेरणादायी आहे.
  • आजचे हे श्रमदान म्हणजे उद्याच्या पाणी सुरक्षिततेसाठी केलेली मौल्यवान गुंतवणूक आहे.
  • तुमच्या या पुढाकारातून, सहभागातून जलसंधारणाची ही चळवळ अधिक व्यापक होईल, असा विश्वास यानिमित्ता ने व्यक्त करण्यात आला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles