माजी आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मातोश्रींचे निधन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सावंत कुटुंबीयांची सांत्वनपर भेट. 

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- शिवसेनेचे मुख्य ने ते आणि भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मातोश्री श्रीमती भिवराबाई ज यवंतराव सावंत यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.
  • या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे येथील सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन सावं त कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
  • श्रीमती भिवराबाई सावंत यांच्या निधनाची माहिती मिळ ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांच्या पुणे येथील निवासस्थानाला भेट दिली.
  • त्यांनी प्रा. डॉ. तानाजीराव सावंत आणि त्यांच्या सर्व कुटुं बीयांशी संवाद साधून या कठीण आणि दुःखद प्रसंगी आ पल्या तीव्र संवेदना व्यक्त केल्या.
  • तसेच, दिवंगत भिवराबा ई सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहा र अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले व भावपू र्ण श्रद्धांजली वाहिली.
  • या सांत्वनपर भेटीदरम्यान आमदार किरण सामंत यांच्या सह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
  • सावंत कुटुंबाने नेहमीच समाजसेवेचा मोठा वारसा जपला असून, या दुःखद प्रसंगी संपूर्ण राजकीय आणि सामाजि क वर्तुळातून सावंत कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles