
बावची विद्यालयाचे प्राचार्य नारायण खैरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते पुण्यात गौरव.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-बावची विद्यालय (प रंडा) येथील प्राचार्य नारायण खैरे यांना शैक्षणिक क्षेत्राती ल उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पु रस्काराने सन्मानित करण्यात आले.
- महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवानि मित्त पुणे येथील सेनापती बापट मार्गावरील बालभारती समोरील ‘सारथी’ सभागृहात रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
- महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते प्राचार्य खैरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

- या प्रसंगी प्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ.श्रीमंत कोकाटे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा उद्योजक प्रमोदअप्पा देश मुख प्रामुख्याने उपस्थित होते.
- प्राचार्य नारायण खैरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्ले खनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेतलेले परिश्रम आणि विद्यालयाच्या गुणवत्तावाढीसाठी दिलेले योगदान विचारात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
- त्यांच्या या यशामुळे परंडा तालुक्यात व विशेषतः बावची विद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
- या सोहळ्याला माजी शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिर गणे, संस्थेचे संस्थापक बिभीषण रोडगे, सचिन पाटील, स चिन मोरे, उमेश पाटील, रविंद्र शिंदे, शिवाजी खैरे, शुभम रोडगे आदी मान्यवर व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उप स्थित होते. प्राचार्य खैरे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






