चोरवणे येथे ग्रामविकास मंडळ,चाकरमानी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून टेपवणे नदीपात्रात येथे उभारला बंधारा. 

  • प्रतिनीधी : खेड : प्रमोद तरळ :- भविष्यातील भीषण पाणीटंचाईवर मात करून गावाला जलसमृद्ध बनविण्या च्या उद्देशाने चोरवणे उतेकर गावठाण येथील टेपवणे नदी तील पिण्याच्या पाण्याच्या डोह परिसरात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जलसंवर्धन मोहीम राबवि ण्यात आली.
  • चोरवणे नागेश्वर ग्रामविकास मंडळ,मुंबई/पुणे आणि ग्राम स्थ यांच्या संयुक्त पुढाकारातून सलग तीन दिवस श्रमदान करून जलसंवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचल ण्यात आले.
  • या मोहिमेदरम्यान नदीपात्रातील गाळ, मोठे दगड आणि वाळू बाजूला करून पाण्याचा साठा वाढविण्याच्या दृष्टीने टेपवणे नदीपात्राची स्वच्छता,खोली व रुंदीकरण करण्या त आले.
  • सामूहिक श्रमदानातून पाणी अडविण्यासाठी अनुकूल प रिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्यावरही भर देण्यात आला.
  • मोहिमेच्या पुढील टप्प्याच्या नियोजनासाठी नदीपात्रातील अन्य दोन ते तीन संभाव्य ठिकाणांची पाहणी करण्यात आली.
  • या ठिकाणी भविष्यात बंधारे उभारून पावसाचे पाणी अडविणे आणि भूजल पातळी वाढविणे हे ग्रामविकास मंडळांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • दीर्घकालीन उपाययोजना म्हणून पक्का आरसीसी बंधारा उभारण्याचाही मानस असून, त्यासाठी लोकसहभागातून निधी संकलित करून चोरवणे गावाच्या जलसंवर्धनाला कायमस्वरूपी दिशा देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
  • या मोहिमेसाठी चोरवणे नागेश्वर ग्रामविकास मंडळ मुंबई चे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ सल्लागार श्री.भिकाजी महादे व उतेकर, माजी सचिव तथा ज्येष्ठ सल्लागार श्री. सुधाक र महादेव उतेकर,ज्येष्ठ ग्रामस्थ श्री.मारुती धोंडू उतेकर, श्री.गजानन आत्माराम उतेकर,श्री. शिवाजी केशव उतेकर आणि माजी उप सरपंच श्री.प्रवीण तुकाराम सावंत,श्री वि जय सीताराम जाधव,श्री.‌अनंत बाबाजी जाधव,श्री. शांता राम बाबाजी उतेकर,श्री प्रमोद पांडुरंग जाधव, श्री.मनोहर रघूनाथ सकपाळ, श्री.मानाजी केशव उतेकर, श्री.चंद्रकांत कृष्णा जाधव, श्री.दिलिप दगडू उतेकर,श्री सुरेश गोपाळ उतेकर,श्री.‌ सुरेश विष्णू सकपाळ, श्री युवराज विजय जा धव, श्री. मनोहर अनंत उतेकर, श्री.ज्ञानेश्वर धारोजी उतेक र, श्री.चंद्रकांत रघुनाथ सकपाळ, श्री.अनंत मारोती उतेक र, श्री.मंगेश धोंडू मोरे,श्री.मंगेश महादेव उतेकर, श्री.किशो र अनंत शिंदे,श्री भरत शांताराम जाधव व श्री.महादेव पां डुरंग उतेकर,श्री.अनिल गंगाराम उतेकर सर,श्री.राजेश शां ताराम उतेकर,तसेच श्रीम.पूनम प्रमोद जाधव व श्रीमती श्रध्दा प्रविण सावंत या महिलांसह स्नानिक महिलावर्ग उपस्थित होत्या.
  • मुंबई व पुणे येथील चाकरमानी आणि ग्रामस्थांनी मोठा पुढाकार घेतला.‌ सर्वांच्या एकजुटीतून आणि लोकसहभा गातून ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.
  • या उपक्रमाला नाम फाउंडेशनचे श्री.प्रथमेश पोमेंडकर, अ नुलोमचे श्री.मयुरेश पाटणकर,ग्रामपंचायत प्रशासन, हित चिंतक श्री.बनेमामा,चोरवणे गावातील ग्रामस्थ,तरुण मंड ळी, महिलावर्ग तसेच शारदा विहार माध्यमिक विद्यालया तील विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहभागा मुळे मोहिमेला अधिक बळ मिमिळाले
  • मुंबईहून प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रमदान करणारे कार्यकर्ते या मोहिमेत मुंबईहून प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रमदान कर णारे श्री.शंकर नारायण उतेकर,ग्रामविकास मंडळाचे सचि व श्री.प्रसाद गजानन उतेकर,श्री.प्रशांत प्रकाश उतेकर, श्री.योगेंद्र यशवंत मोरे,श्री.सागर ज्ञानेश्वर उतेकर, श्री.संज य विष्णू सकपाळ, श्री.निकेश संजय चव्हाण,श्री.समीर शं कर उतेकर, श्री.संकेत भिकाजी उतेकर,श्री. स्वप्नील रमेश उतेकर आणि श्री. दिनेश विजय जाधव यांच्यासह सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.
  • कामधंदा सांभाळून सुट्टीच्या दिवशी गावासाठी वेळ देत श्रमदान करणाऱ्या या कार्यकर्त्यांची गावाप्रती असलेली बांधिलकी निश्चितच प्रेरणादायी आहे.
  • या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होता न आलेल्या मुंबई व पुणे येथील ग्रामस्थांनीही आर्थिक योगदान देऊन जलसंव र्धनाच्या कार्याला हातभार लावला.
  • त्यामुळे प्रत्यक्ष श्रमदानासोबतच आर्थिक सहकार्याच्या माध्यमातूनही गावकऱ्यांची एकजूट दिसून आली.
  • सर्व देणगीदार, ग्रामस्थ, सहकार्य करणाऱ्या संस्था आणि हितचिंतक मार्गदर्शकांचे मंडळाच्या वतीने आभार मान ण्यात आले.
  • बदलते हवामान, पावसाचे अनिश्चित प्रमाण आणि उन्हा ळ्यात जाणवणारी भविष्यातील भीषण पाणीटंचाई लक्षा त घेता जलसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे.
  • केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता लोकसह भागातून गावाच्या पाणीप्रश्नावर दीर्घकालीन उपाय शोधण्याचा हा प्रयत्न आहे.
  • काळात आणखी बंधारे उभारून चोरवणे गावाला जलस मृद्ध बनविण्याचा निर्धार चोरवणे नागेश्वर ग्रामविकास मंडळ, मुंबई/ पुणेयांनी व्यक्त केला आहे.
  • पाणी अडवा, पाणी जिरवा —गाव वाचवा, भविष्य घडवा. या संदेशातून गावाच्या जलसंवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन योगदान द्यावे,असे आवाहन करण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles