
खासगाव येथे कौटुंबिक वादातून पतीचा पत्नी व सासऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला; परंडा पोलिसांत गुन्हा दाखल.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीला आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सासऱ्याला चाकूने व लाथाबुक्यांनी मारहाण क रून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना परंडा ता लुक्यातील खासगाव येथे घडली आहे.
- आरोपी पतीविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात विविध कलमां न्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आबासाहेब देवि दास पाटील (वय ३८, रा.खासगाव, ता.परंडा, जि. धाराशि व) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
- रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३:०० ते ३:३० वाजण्याच्या सुमारास खासगाव येथे ही घटना घडली.
- आरोपी आबासाहेब पाटील याने कौटुंबिक वादाचे कारणा वरून त्याची पत्नी सुप्रिया आबासाहेब पाटील (वय २५) यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि चाकू ने वार करून गंभीर जखमी.
- यावेळी सुप्रिया यांचे वडील दत्तात्रय मोटे हे भांडण सोडव ण्यासाठी मध्यस्थी करण्यास आले असता, आरोपीने त्यां च्यावरही चाकूने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच दोन्ही बाप-लेकीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
- या प्राणघातक हल्ल्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णा लयात दाखल करण्यात आले होते.
- रुग्णालयात उपचार घेत असताना सुप्रिया पाटील यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून (Medical Stateme nt) परंडा पोलीस ठाण्यात आरोपी आबासाहेब पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८ (२), ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






