
येडशीतील करंडे कुटुंबीयांचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून सांत्वन; प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनावर व्यक्त केली तीव्र नाराजी; मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शासकीय मदतीचे आश्वासन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- धाराशिव तालुक्या तील येडशी येथे दिवाळीच्या सणादरम्यान किराणा दुका नाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
- या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला असून, अ खिल भारतीय तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मा जी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांनी येडशी येथे भेट देऊन करंडे कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग नोंदविला.
- येडशी येथील वीरशैव लिंगायत तेली समाजातील करंडे कुटुंबावर काळाने घाला घातला.

- मध्यरात्री अडीचच्या सुमारास किराणा दुकानाला लागले ल्या भीषण आगीत उत्तम त्रिंबक करंडे, चंद्रकला उत्तम क रंडे, गोविंद उत्तम करंडे, ज्योती गोविंद करंडे, गायत्री गोविं द करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे या सहा जणांचा होरप ळून मृत्यू झाला.
- धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांनी या दुर्घटनेची माहिती देऊन घटना स्थळी भेट देण्याची विनंती केली होती.
- त्यानुसार क्षीरसागर यांनी येडशी येथे येऊन जळीतग्रस्त घटनास्थळाची पाहणी केली आणि करंडे कुटुंबीयांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले.
- यावेळी रवि कोरे आळणीकर यांनी आगीची घटना व मद तकार्यात आलेल्या अडचणींची माहिती दिली.
- प्रशासनाच्या कारभारावर नाराजी
- दुर्घटनेच्या वेळी वेळेवर मदत पोहोचली नसल्याच्या स्था निक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
- “जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आणि फटा का उद्योग आहेत.
- असे असतानाही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्या साठी अत्याधुनिक अग्निशमन व बचाव यंत्रणा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे.
- भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यात सक्षम आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणे अ त्यंत गरजेचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
- शासकीय मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
- करंडे कुटुंबावर कोसळलेल्या या संकटातून सावरण्यासा ठी आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत.
- या घटनेची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ना देऊन, पीडित कुटुंबाला शासनाकडून भरीव आर्थिक मदत आणि आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रय त्न करणार असल्याचे आश्वासनही क्षीरसागर यांनी दिले.
- यावेळी जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास बडगे, अरुण बोगाने यांच्यासह तेली समाजातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात हसत्या-खेळत्या कुटुं बाचा असा अंत झाल्याने उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






