परंडा-बार्शी राज्यमार्गावरील २१ बेकायदेशीर गतिरोधक तत्काळ काढा; ‘आधार सामाजिक संस्थे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा ते बार्शी या राज्यमार्गावरील परंडा ते बारदवाडी दरम्यानच्या अवघ्या १२ किलोमीटरच्या अंतरात असलेले २१ बेकायदेशीर गतिरोधक तत्काळ काढून टाकण्यात यावेत, अशी आग्रही मागणी परंडा येथील ‘आधार सामाजिक संस्थे’च्या वतीने करण्यात आली आहे.
  • या संदर्भात संस्थेने सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन दिले आहे.
  • परंडा ते बार्शी या एकूण २८ किलोमीटरच्या राज्यमार्गावर तब्बल ४१ गतिरोधक आहेत.
  • त्यापैकी परंडा ते बारदवाडी या १२ किलोमीटरच्या हद्दीत च २१ गतिरोधक अनधिकृतपणे उभारण्यात आले आहेत.
  • विशेष म्हणजे, एकाच ठिकाणी अवघ्या २०० मीटर अंतरा त तब्बल ५ गतिरोधक बसवण्यात आल्याचा धक्कादाय क प्रकार निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आला आहे.
  • नियमांची पायमल्ली आणि जीवितहानीचा धोका
  • निवेदनात नमूद केल्यानुसार, आयआरसी ९९-२०१८ (IR C 99-2018) या मानकांनुसार गतिरोधकाची उंची १० सेंटीमीटरपेक्षा जास्त असू नये, मात्र येथे त्याचे उल्लंघन झाले आहे.
  • तसेच या गतिरोधकांवर पांढरे पट्टे नाहीत, २० मीटर आ धी कोणतेही सूचना फलक लावलेले नाहीत आणि दोन गतिरोधकांमधील अंतराचा नियमही पाळलेला नाही.
  • या गतिरोधकांसाठी वाहतूक पोलिसांची परवानगी घेतली आहे की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त करण्यात आ ली आहे.
  • राज्यमार्गावर उंच गतिरोधक बसवण्यास बंदी असून निय मानुसार केवळ ‘रम्बलर स्ट्रिप’ लावता येतात. मात्र, या अ नधिकृत आणि उंच गतिरोधकांमुळे प्रवासाचा वेळ तिपटी ने वाढला आहे.
  • परंडा येथे मोठे व अत्याधुनिक रुग्णालय नसल्याने अत्यव स्थ रुग्ण आणि गर्भवती महिलांना पुढील उपचारासाठी बार्शी येथे न्यावे लागते.
  • मात्र, या गतिरोधकांच्या अडथळ्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने काही रुग्ण रस्त्यातच दगावल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत.
  • याशिवाय, अनेक लहान-मोठे अपघात होऊन जीवितहानी होत असून वाहनांचे नुकसान आणि चालकांना मणक्याचे व शरीराचे आजार जडून आर्थिक फटका बसत आहे.
  • त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घे ऊन हे २१ बेकायदेशीर गतिरोधक हटवावेत, अशी माग णी आधार सामाजिक संस्थेने केली आहे.
  • या निवेदनाच्या प्रती माहिती व पुढील कार्यवाहीसाठी धा राशिवचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभि यंता (धाराशिव) आणि वाहतूक विभागाचे पोलीस अधी क्षक (धाराशिव) यांना पाठवण्यात आल्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles