पंढरपूर–कुर्डूवाडी–जालना–शेगाव रेल्वेमार्गासाठी परंड्यात सर्वपक्षीय एल्गार; पाठपुराव्याचा निर्धार.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- भूम–परंडा–वाशी परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देऊ शकणा ऱ्या प्रस्तावित पंढरपूर–कुर्डूवाडी–जालना–शेगाव रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी परंडा येथे रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठक पार पडली.
  • या बैठकीत पक्षीय मतभेद बाजूला ठेवून केंद्र व राज्य शा सनाकडे सातत्याने आणि नियोजनबद्ध पाठपुरावा कर ण्याचा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला.
  • अनेक वर्षांपासून रेल्वे सुविधेच्या प्रतीक्षेत असलेल्या या परिसराला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा रेल्वेमार्ग अत्यंत आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी मांडले.
  • हा मार्ग केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित न राहता शेतमालाची वाहतूक, दुग्धव्यवसाय, व्यापार, उद्योग, पर्य टन आणि युवकांच्या रोजगारनिर्मितीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
  • या बैठकीत नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील भैय्यासाहेब यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत पुढील काळा त हा लढा कसा यशस्वी करता येईल, याबाबत उपस्थितां ना मार्गदर्शन केले.
  • रेल्वे प्रकल्पाच्या मंजुरीसाठी केवळ मागणी करून चाल णार नाही, तर अभ्यासपूर्ण प्रस्ताव आणि नियोजनबद्ध पाठपुरावा गरजेचा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
  • यापूर्वी पुणे येथे भक्तिमार्गाच्या अनुषंगाने खासदार व सं बंधित अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेचा अनुभव मांडत प्र वासी व मालवाहतुकीची क्षमता, आर्थिक व्यवहार्यता, ज नतेची मागणी आणि शेतकऱ्यांचा सहभाग या तांत्रिक बाबींवर विशेष भर देण्यात आला.
  • माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी रेल्वेमार्गाच्या मा गणीचा ऐतिहासिक संदर्भ देत अभ्यासपूर्ण भूमिका मांडली.
  • या रेल्वेमार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिफा रसपत्र मिळविण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
  • तसेच या लढ्याचे नेतृत्व करून पुढाकार घ्यावा, सर्वपक्षी य नेते खंबीरपणे पाठीशी उभे राहतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटी ल यांनी निःस्वार्थ भावनेने सर्वपक्षीय नेत्यांना एकाच व्या सपीठावर आणल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्या त आले.
  • हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून भू म–परंडा–वाशी परिसरातील लाखो नागरिकांच्या विका साशी आणि भावी पिढ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे.
  • त्यामुळे रेल्वे संघर्ष समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्व स्तरांवर पाठपुरावा करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.
  • प्रमुख उपस्थिती :
  • या बैठकीस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताआण्णा साळुंके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष उ मेशराजे निंबाळकर, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रण जित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे व तानाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान सभा अध्यक्ष नवनाथ जगताप, रिपाई (आठवले गट) चे मराठवाडा सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, वंचित बहु जन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, मा जी उपसभापती मेघराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समि तीचे संचालक विशाल ढगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचं द्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष किरण करळे, उद्योगपती रा मचंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस प्रवीण घोलप, ॲड. दादा साहेब खरसडे, रेल्वे संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष संतोष व रळे (हाय इन्फोटेक भूम) यांच्यासह विविध पक्षांचे पदाधि कारी, सामाजिक कार्यकर्ते व समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीम शेख सर यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles