
अनधिकृत वीज जोडणीवरून सुरू असलेल्या वेल्डिंगमुळे वणवा लागल्याचा ग्रामस्थांचा आरोप; शेकडो एकर शेतजमीन, फळझाडे आणि वृक्षसंपदा जळून खाक.
- प्रतिनिधी : हिराजी देसले :-दि.१३ नोव्हेंबर २०२६ शहा पूर तालुक्यातील साकडबाव परिसरात एका खासगी फा र्महाउसवरील सुरू असलेल्या कामादरम्यान झालेल्या क थित निष्काळजीपणामुळे भीषण वणवा लागल्याची घट ना शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) सकाळी १०.४५ वाजण्या च्या सुमारास घडली.
- जुनवनी ते साकडबाव या अंतर्गत रस्त्यालगत घडलेल्या या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले.

- या वणव्यात साकडबाव व मळेवली परिसरातील शेतक ऱ्यांची शेकडो एकर शेतजमीन, राबणीसाठी साठवलेले गवत, फळझाडे तसेच जैवविविधतेसाठी करण्यात आले ली वृक्षलागवड जळून खाक झाली.
- एका व्यक्तीच्या बेजबाबदारपणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टांवर पाणी फिरल्याची संतप्त भावना ग्राम स्थांमध्ये व्यक्त होत आहे.
- नेमके घडले तरी काय?
- स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनवनी-सा कडबाव अंतर्गत रस्त्यालगत असलेल्या एका खासगी फार्महाऊसच्या जागेवर कंपाउंडचे काम सुरू होते.
- या कामासाठी महावितरणच्या वीज खांबावरून अधिकृत परवानगीशिवाय वीज जोडणी घेऊन वेल्डिंग मशीनचा वा पर केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
- परिसरात सर्वत्र सुकलेले गवत असताना कोणतीही अग्नि सुरक्षा व्यवस्था किंवा पाण्याची सोय न करता वेल्डिंगचे काम सुरू होते.

- या कामातून उडालेल्या ठिणग्यांमुळे सुक्या गवताने पेट घेतल्याचा प्राथमिक आरोप आहे.
- पाहता पाहता आगीने भीषण स्वरूप धारण केले. वाऱ्या च्या वेगामुळे आगीच्या ज्वाळा कामत भागातून गावाच्या दिशेने पसरू लागल्या. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
- शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट राखेत!
- या वणव्यामुळे साकडबाव व मळेवली परिसरातील शेतक ऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
- शेतातील उभे गवत, शेतीच्या राबणीसाठी साठवून ठेवले ला चारा आणि अनेक फळझाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
- जनावरांसाठी वर्षभर पुरेल या उद्देशाने साठवलेला चारा जळाल्याने पशुपालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
- विशेष म्हणजे, परिसरात गेल्या दोन वर्षांपासून जैवविवि धता संवर्धनाच्या उद्देशाने करण्यात आलेली वृक्षलागवड ही या आगीत नष्ट झाली.
- सागवान, फणस, आंबा यांसह अनेक झाडांची रोपे आणि मोठ्या वृक्षांचे आगीत नुकसान झाले. पर्यावरण संवर्धना साठी केलेले प्रयत्न काही तासांत राख झाले.
- ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे गावावरचे संकट टळले…!
- वणवा गावाच्या दिशेने वेगाने सरकत असताना बांधीविहि र परिसरात मुख्य वीज वाहिनीपर्यंत आग पोहोचली होती.
- परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी तातडीने घरांचे मेन स्विच बंद केले. तसेच महावितरणच्या स्थानिक कर्म चाऱ्याने घटनास्थळी धाव घेत वीजपुरवठा खंडित केला.
- गावातील तरुण आणि नागरिकांनी जीवाची पर्वा न करता एकजुटीने आग गावात शिरण्यापासून रोखण्यासाठी प्रय त्न केले. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
- प्रशासनाच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल
- घटनेची माहिती मिळताच शहापूरचे तहसीलदार, डोलखां ब पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, शहापूर नगरपा लिकेचे अग्निशमन दल तसेच वनविभागाचे वनपाल आ णि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
- सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न केल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
- दोषींवर कारवाई करा, शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई धा. !
- या घटनेमुळे नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
- अनधिकृत वीज जोडणी आणि आवश्यक सुरक्षा उपायां चा अभाव यामुळे आग लागली असल्याचा आरोप करत संबंधित फार्महाऊसधारकाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

- ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत.
- १. अनधिकृत वीज जोडणी आणि सुरक्षा नियमांचे उल्लं घन केल्याच्या आरोपांची महावितरण व पोलिसांनी सखो ल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
- २. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत नुकसानग्रस्त शेतजमीन, फळझाडे, वृक्षसंपदा आणि जनावरांच्या चा ऱ्याचे तातडीने पंचनामे करावेत.
- ३. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार योग्य व पूर्ण आर्थिक नुकसानभरपाई मिळवून द्यावी.
- ४. वनविभागाने जळालेल्या वृक्षसंपदेचे स्वतंत्र सर्वेक्षण करून पुन्हा वृक्षलागवडीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- ५. या घटनेची जबाबदारी निश्चित करून संबंधित दोषीं कडून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत.
- एका खासगी कामातील कथित निष्काळजीपणाची किंम त आज संपूर्ण परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि निसर्गाला मोजावी लागत आहे.

- शेतकरीच्या वर्षभराच्या कष्टांची राख झाली, दोन वर्षांची वृक्षलागवड नष्ट झाली आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. आता प्रशासन केवळ पंचनामे ककरून थांबणार.
- दोषींवर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देणार, याकडे संपूर्ण साकडबाव परिसराचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






