टोलेजंग इमारतींच्या गर्दीतही चाळ संस्कृतीचा जिव्हाळा जपणारा ‘रायझिंग सन’चा दिपोत्सव उत्साहात संपन्न…..!

  • प्रतिनीधी : कांदिवली : प्रमोद तरळ :-आजच्या धकाध कीच्या जीवनात आणि टोलेजंग इमारतींच्या वाढत्या गर्दी त हळूहळू लोप पावत चाललेली चाळ संस्कृती, कार्य चार कोप -कांदिवली परिसरातील काही मंडळे सातत्याने करी त आहेत.
  • मराठमोळे सण-उत्सव एकत्रितपणे साजरे करताना सामा जिक आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोच विण्याचा वसा घेतलेल्या मंडळांमध्ये चारकोप सेक्टर १ येथील ‘रायझिंग सन क्रिडा उत्सव मंडळा’चे नाव आवर्जून घ्यावे लागेल.
  • मंडळाच्या वतीने यंदा दिवाळीनिमित्त आयोजित करण्या त आलेला ‘दिपोत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात आणि ज ल्लोषात संपन्न झाला.
  • दिवाळीच्या दरम्यान तसेच त्यानंतरच्या संपूर्ण आठवडाभ र रहिवाशांसाठी विविध मनोरंजक, सांस्कृतिक, क्रिडा आ णि सामाजिक उपक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली होती.
  • २८ वर्षांपासून मंडळाने ही परंपरा जपत चारकोप परिस रातील नागरिकांना एकत्र आणण्याचे आणि उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक नाते अधिक दृढ करण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवले आहे.
  • मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी भैरव स्माईल इन्फ्रा प्रो जेक्टचे सर्वेसर्वा श्री.निखिल सुर्वे आणि श्री.किशोर दळवी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून दिपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
  • यानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत स्पर्धकांनी सामाजि क संदेश देणाऱ्या तसेच पारंपरिक विषयांवरील सुंदर आ णि आकर्षक रांगोळ्या साकारल्या.
  • पंचांनी या रांगोळ्यांचे परीक्षण करून स्पर्धकांच्या कलागु णांचे कौतुक केले. १३ नोव्हेंबर रोजी महिला व पुरुष क्रिकेट स्पर्धा तसेच पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  • क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे कार्यक र्ते श्री.केतन धाटावकर आणि श्री.शिरीष दहिबावकर यां नी विशेष मेहनत घेतली.
  • यंदाच्या पाककला स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच पुरुष स्पर्धकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी एकापेक्षा एक रुचकर आणि खमंग पदार्थांची आकर्षक मांडणी केली होती.
  • मूळच्या वरळी-कोळीवाडा येथील असलेल्या सौ.सुचिता चौलकर यांनी यंदाही खास मासळीच्या पदार्थांचा बेत सादर केला.
  • त्यांच्या या खास पाककृतीचा उपस्थित मान्यवरांनीही मनमुराद आनंद घेतला.
  • १४ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
  • त्यानंतर आयोजित रासगरबा कार्यक्रमात पारंपरिक वेश भूषा आणि उत्कृष्ट नृत्याच्या माध्यमातून सहभागी कला कारांनी उपस्थितांची मने जिंकली.
  • बालदिनाचे औचित्य साधून लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान  मुलां ना खाऊचे वाटप करून बालदिनाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
  • लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला या दीपोत्सवात सहभागी होता यावे, याची विशेष काळजी मंडळाने घेत ली होती.
  • दिपोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महिलांच्या विशेष आकर्ष णाचा केंद्रबिंदू ठरलेला ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आयो जित करण्यात आला.
  • श्री.प्रशांत प्रिंदावणकर आणि श्री. सुधाकर वस्त यांनी आपल्या खुमासदार शैलीत विविध नवनवीन खेळ आणि मनोरंजक स्पर्धांच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली.
  • या कार्यक्रमात तब्बल १५० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
  • दैनंदिन कौटुंबिक जबाबदाऱ्या, घर आणि नोकरीच्या धाव पळीत व्यस्त असलेल्या महिलांना स्वतःसाठी आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत, एकमेकींशी संवाद साधता यावा आणि आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम महिलां साठी खऱ्या अर्थाने आनंदाची पर्वणी ठरला.
  • या कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजनासाठी विशेष पाठबळ देणारे मनसेचे ‘आपला माणूस’ श्री. भूषण अनंत विचारे हे स्वतः उपस्थित राहून संपूर्ण आयोजनावर लक्ष ठेवून होते.
  • विशेष म्हणजे परिसरातील १४ संस्थांमधील महिलांना या कार्यक्रमाची दरवर्षी आतुरतेने प्रतीक्षा असते.
  • या स्पर्धेत जिंकणे किंवा हरणे यापेक्षा एकत्र येऊन आनं दाचे क्षण अनुभवणे, मैत्रीचे बंध अधिक दृढ करणे आणि स्वतःमधील कलागुणांना वाव देणे हेच अधिक महत्त्वाचे असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.
  • मंडळाच्या या उपक्रमाचे महिलांनी विशेष कौतुक करून आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
  •   रोषणाईने उजळला संपूर्ण परिसर; सामाजिक एकोप्याचा संदेश
  • दिवाळीनिमित्त संपूर्ण रस्त्यावर करण्यात आलेली आकर्ष क विद्युत रोषणाई हे दीपोत्सवाचे आणखी एक खास आकर्षण ठरले.
  • रोषणाईने उजळलेला संपूर्ण परिसर, विविध कार्यक्रमां मधील नागरिकांचा उत्साह आणि एकत्रितपणे सण साज रा करण्याची भावना यामुळे चारकोप सेक्टर १ मध्ये खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत होता.
  • आजच्या काळात सण केवळ घरापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण परिसराने एकत्र येऊन साजरे करणे, नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे आणि समाजा तील परस्परांचे नाते जपणे, हेच या दीपोत्सवाचे खरे यश म्हणावे लागेल.
  • मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश सोरप यांनी सर्व देणगीदार, प्रायोजक, रहिवासी, सहभागी स्पर्धक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
  • तसेच सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून सहभागी झालेल्या प्रत्येकाचे कौतुक केले.
  • कार्यकर्त्यांच्या एकजुटीतून दीपोत्सव यशस्वी
  • या संपूर्ण दिपोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी अध्यक्ष श्री.राजेश सोरप, चिटणीस श्री.अमित पालांडे, खजिनदार श्री. सुनीत कदम, श्री. राहुल केदारी, श्री. निलेश धावडे, श्री. श्रीनिवास एन., श्री. विशाल पंड्या, श्री. संदीप कदम, श्री. प्रवीण सावंत, श्री. चेतन चौलकर, श्री. राजेंद्र परब, श्री. अभिजित इळकर, श्री. सागर गाढवे, श्री. प्रशांत कडू, थोरवे बंधू, श्री. अनिल लोखंडे, डॉ. मकरंद गावडे, श्री. हरीश सूर्यवंशी, श्री. विष्णू आणि श्री. पप्प्या यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.
  • सदर दीपोत्सवातील विविध कार्यक्रमांना विशेष रंगत आ णण्याचे काम जग्गू यांच्या बहारदार डी.जे. सादरीकरणाने केले.
  • त्यांच्या जोशपूर्ण संगीतामुळे संपूर्ण परिसरातील उत्साह आणि जल्लोष द्विगुणित झाला.
  • मंडळाचे सल्लागार श्री.सुधाकर कदम, श्री.कमलाकर सक्रे आणि श्री. राजेश सोनावणे यांचेही संपूर्ण नियोजन व व्यवस्थापनावर विशेष लक्ष होते.
  • दिपोत्सव म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई किंवा मनोरंज नाचे कार्यक्रम नव्हेत, तर माणसामाणसांतील नाती उज ळविण्याचा, आपुलकीचे बंध जपण्याचा आणि समाजाला एकत्र आणण्याचा एक सुंदर उत्सव आहे.
  • चारकोपमधील रायझिंग सन क्रिडा उत्सव मंडळ गेली २८ वर्षे याच भावनेतून आपली परंपरा जपत आहे.
  • टोलेजंग इमारतींच्या युगातही चाळ संस्कृतीतील माणुस की, एकोपा आणि आपलेपणाचा सुगंध कायम ठेवणारा हा दिपोत्सव म्हणजे केवळ एका मंडळाचा कार्यक्रम नसू न संपूर्ण परिसराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकते चा उत्सव ठरला आहे.!
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles