तुळजापूर प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा; पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत द्या….!

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- तुळजापूर येथे प्रेमप्रकरणा च्या संशयातून दोन तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात समीर जब्बार पटेल यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती.
  • या अमानुष घटनेतील सर्व आरोपींवर कठोरात कठोर का यदेशीर कारवाई करून दोषींना कडक शिक्षा द्यावी, तसेच मृत समीर पटेल यांच्या कुटुंबीयांना शासनाने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी ठाम मागणी मुस्लिम एकता सामाजिक संघटनेने केली होती.
  • अखेर या मागणीची प्रशासनाने दखल घेतली असून, भूम च्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत पत्र पाठवले आहे.
  • मुस्लिम एकता सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार (रा. भूम) यांनी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी भूम उपविभागीय अधिकारी का र्यालयात यासंदर्भात निवेदन सादर केले होते.
  • तुळजापूर येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, या प्रकरणा तील दोषींना कोणतीही पाठराखण न करता कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
  • तसेच मृत तरुणाच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचा विचार करून शासनाने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली होती.
  • प्रशासनाकडून निवेदनाची गंभीर दखल
  • संघटनेने केलेल्या मागणीची गंभीर दखल घेत भूम उपवि भागीय अधिकारी कार्यालयाने मूळ निवेदनाची प्रत जोडून जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे पुढील योग्य त्या का र्यवाहीसाठी अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्राची प्रत
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles