शिरवली गावची सुकन्या कु.सृष्टी सुरेश कुळये UPSC परिक्षा उत्तीर्ण; युवक मंडळ शिरवलीने केले जाहीर अभिनंदन.

  • प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौजे शिरवली पलीकडची वाडी येथील सुकन्या सध्या शिक्षणा साठी मानखुर्दच्या शिवनेरी नगरमध्ये आपल्या आईवडि ल, भावंडासह झोपडपट्टीत राहणाऱ्या कु.‌सृष्टी सुरेश कुळ ये हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेत घवघवीत यश मिळवले असून देशात ८३१ रॅंक प्राप्त केले आहेत.
  • कु.सृष्टी हिने राज्यशास्त्र या विषयांत पदवी प्राप्त केली आहे तिचे वडील हे प्रिंटींग प्रेस मध्ये मशीन ऑपरेटरचे काम करतात तर आई गृहिणी आहे.
  • सृष्टीला अजून दोन भावंडे असून सृष्टी ही सर्वात मोठी आहे अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती आणि अभ्यास करण्याची जिद्द या जोरावर तिने नागरी सेवेत जाण्याचे आपले साकार केले आहे.
  • सृष्टीने झोपडपट्टीत अभ्यास होणार नाही म्हणून २०२२ मध्ये गोवंडी येथील एम पाॅवर लायब्ररीत प्रवेश घेतला कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही कोचिंग क्लासला जाण्याची ऐपत नाही याचा मनात न्यूनगंड न बाळगता तिने स्वतःच अभ्यास करून हे यश मिळवत गावासह लांजा तालुक्यातील तरुणाई समोर आदर्श निर्माण केला आहे.
  • तिने मिळविलेल्या या यशाबद्दल शिरवली गावासह लांजा तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून समस्त कुळ ये परिवार आणि युवक मंडळ शिरवलीने तिचे जाहीर अ भिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
  • आई वडील माझे खरे मार्गदर्शक असून मला सर्वांनी प्रो त्साहन दिले म्हणूनच येथवर पोहोचू शकलो असे कु.सृष्टी ने हिने सांगत सर्वांचे आभार मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles