
वंचित बहुजन आघाडी परंडा तालुका नुतन कार्यकारणी साठी होणार मुलाखत ; पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केली धनंजय सोनटक्के यांची निवड.
- प्रतिनिधी : परडा : फारूख शेख :- दि. २२/५/२५२५) धाराशिव येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी संवाद मेळावा मंगळवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद नाट्यगृहा मध्ये पक्षाचे राष्ट्री य अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये संप्पन झाला.
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगा ने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी धाराशिव जिल्ह्या तील प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्यात आला.
- वंचित बहुजन आघाडी परंडा तालुका नवीन कार्यकारणी निवड करण्यासाठी निवड समिती प्रमुख म्हणून धनंजय सोनटक्के जिल्हा महासचिव यांची ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी आदेशित करून जबाबदारी दिली.
- या प्रसंगी मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल,निरीक्षक अविनाश भोसीकर,फुले आंबेडकर विद्वत सभा राज्य सम न्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे, ॲड.प्रणित डिकले, बि. डि.शिंदे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे, ज नरल कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुधिर वाघमारे, मोहन बनसोडे,उत्तरेश्वर ठवरे,आण्णा काळे, किरण बनसोडे,ईर्शा द बागवान,गणेश सरवदे,भाऊसाहेब आंदुरकर,विकास बनसोडे,नासिर शेख, नामदेव वाघमारे यांच्या सह अनेक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
- वंचित बहुजन आघाडी परंडा तालुका कार्यकारणी निवड करण्यासाठी पक्ष प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार रविवार दिनांक-२५में रोजी शासकीय विश्रा म ग्रह परंडा येथे निवड समितीच्या वतीने मुलाखती होणार आहेत.
- वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या सं ख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा महा सचिव धनंजय सोनटक्के यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/