
करमाळा पोलिसांची धडक कामगिरी: उजनी धरणातील बेवारस महिलेच्या खुनाचा छडा; अवघ्या दोन तासांत आरोपी जेरबंद…!
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- उजनी जलाशयात ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलेल्या एका २६ वर्षीय बेवारस महिलेच्या खुनाचा गूढ उकलण्यात करमा ळा पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आले आहे.
- बलात्काराचा गुन्हा मागे न घेतल्याच्या रागातून आरोपीने या महिलेचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह धरणात फेकून दिला होता.
- याप्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी अवघ्या दोन ता सांत अटक केली आहे.

- धरणामध्ये सापडला होता मृतदेह
- मिळालेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्या काळी ४ वाजण्याच्या सुमारास करमाळा तालुक्यातील बिटरगाव (वांगी) शिवारातील नागनाथ राखुंडे यांच्या शेता जवळ उजनी जलाशयात एका अज्ञात महिलेचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत तरंगताना आढळला होता.
- या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (A.D.R. No. १२९/२०२६) करण्यात आली होती.
- लाँचचे सीसीटीव्ही आणि पाच पथके रवाना
- महिलेची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलक र्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि करमा ळा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस.यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
- पुणे,अहिल्यानगर, धाराशिव, बीड आणि लातूर या भागात ५ पथके रवाना करण्यात आली.
- तसेच,उजनी धरणातील इंदापूर बाजूच्या बंडगर वस्ती आ णि बोकरी भागातील लाँच/बोटीवरील चालक आणि मासेमाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली.
- एका बोटीचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले अस ता, मृत महिलेचे कपडे आणि लाँचमधील एका महिलेचे कपडे जुळले.
- त्यावरून तिचे नाव कीर्ती रामचंद्र कावरे (वय २६,रा.वांगी नं. १, ता. करमाळा) असल्याचे निष्पन्न झाले.
- बलात्काराची केस मागे न घेतल्याने खून
- पोलिसांनी अधिक तपास केला असता, मृत कीर्ती हिने वांगी येथील भगवान महादेव कांबळे याच्याविरुद्ध यापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
- हा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी भगवान याने १५ ऑग स्ट २०२६ रोजी कीर्तीला धमकी दिली होती, ज्याची नोंद इंदापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NC) म्हणून कर ण्यात आली होती.
- याच रागातून आरोपीने तिचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडा ळून उजनी धरणात फेकून दिला.
- मृत महिलेची आई रुपाली सुशादेव चांदणे (रा. कांदलगा व, ता.इंदापूर) यांच्या तक्रारीवरून ७ नोव्हेंबर २०२६ रो जी करमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१), २३८(ए), २३८ (बी), ३५१ (२) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
- तांत्रिक तपास आणि २ तासांत आरोपी जेरबंद
- गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांच्यासह अंमलदारांच्या वेगवेगळ्या पथकांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.
- कसून शोध घेत अवघ्या दोन तासांच्या आत मुख्य आरो पी भगवान महादेव कांबळे याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
- न्यायालयाने आरोपीला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करत आहेत.
- या पथकाने बजावली कामगिरी:
- सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कु लकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, डी.वाय. एस.पी अंजना कृष्णा व्ही.एस.यांच्या मार्गदर्शनाखाली पो लीस निरीक्षक रणजीत माने, पीएसआय संदीप बनकर, पोहेकॉ दुष्यंत कैबरे, पोहेकॉ अलिम मलीक शेख, पोहेकॉ मयूर गाणे, पोना चंद्रकांत गोरे, पोकॉ गणेश शिंदे, पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ योगेश येवले, पोकॉ अमोल बागल आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोकॉ जहिरान नाईकवा डी यांनी केली आहे.
- करमाळा पोलिसांच्या या वेगवान कामगिरीचे सर्वत्र कौतु क होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






