
परांडा तालुक्यातील कुंभेफळ येथे चिमुरड्यांनी साकारला हुबेहूब ‘सिंहगड’; बालकिल्लेदारांचे कौतुक.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कूभेफळ ता परंडा येथे चूमकूल्या लेकराने दिवाळीच्या सुट्ट्यांचा आगळावे गळा आणि आदर्श सदुपयोग करत परांडा तालुक्यातील कुंभेफळ येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेची आणि कौशल्याची चुणूक दाखवली आहे.
- या विद्यार्थ्यांनी एकत्र येत गावात हुबेहूब ‘सिंहगड’ किल्ला साकारला असून, त्यांच्या या अफाट मेहनतीचे आणि ऐति हासिक वारसा जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नाचे संपूर्ण तालु क्यातून भरभरून कौतुक होत आहे.

- आजकालच्या डिजिटल युगात मुले मोबाईल आणि टीव्ही मध्ये व्यस्त असताना, कुंभेफळ येथील या चिमुरड्यांनी मात्र मातीशी आणि इतिहासाशी नाते जोडले.
- दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होताच या विद्यार्थ्यांनी एकत्र ये ऊन किल्ला बनवण्याचे नियोजन केले.
- केवळ हौस म्हणून नव्हे, तर सिंहगड किल्ल्याची रचना डो ळ्यासमोर ठेवून त्याचे बुरूज,तटबंदी आणि दरवाजे अत्यं त हुबेहूब आणि आकर्षक पद्धतीने माती व दगडांच्या साहाय्याने उभे केले आहेत.
- या ऐतिहासिक उपक्रमात आरिश शेख, फरान शेख, शाया न पठाण, अरश पठाण, मुजफर शेख, चांदपाशा शेख, अर सलान शेख, अरहान बेग, उमर शेख आणि आशरफ पठा ण या विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.
- सर्व बालकिल्लेदारांनी दाखवलेली ऐतिहासिक आवड, त्यांचे नियोजन आणि घेतलेले कष्ट पाहून परिसरातील नागरिक थक्क झाले आहेत.
- आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची जाणीव ठेवून या विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांसह परांडा तालुक्यातील सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. या चिमुरड्यांचा हा प्रयत्न इतर मुलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






