
कळंब येथील पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांना ‘मुख्यमंत्री शौर्यपदक’ देण्याची राजे उमाजी नाईक फाउंडेशनची मागणी.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- एका अत्यंत गंभीर व जीवघेण्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गुन्हे गाराचा सामना करत एका तरुणीचे प्राण वाचवणाऱ्या, कळंब पोलीस ठाण्यातील कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी श्री.गणेश वाघमोडे यांना ‘मुख्यमंत्री शौर्यपदक’ प्रदान करण्यात यावे, अशी मागणी ‘द फर्स्ट फ्रीडम फायटर मॅन राजे उमाजी नाईक फाउंडेशन’च्या वतीने करण्यात आली आहे.

- या संदर्भात फाउंडेशनचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. अजय तानाजी वाघमोडे यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
- मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेल्या निवेदनात अजय वाघ मोडे यांनी म्हटले आहे की, पोलीस कर्मचारी गणेश वाघ मोडे यांनी दाखवलेले शौर्य अत्यंत धाडसी, कौतुकास्पद आणि संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे.
- संकटसमयी कर्तव्यतत्परता दाखवून त्यांनी एका तरुणीचे प्राण वाचवले. अशा धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यां च्या पाठीवर शासनाने कौतुकाची थाप देणे गरजेचे आहे.
- गुन्हेगारीचा बिमोड करताना पोलीस कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे रक्षण करतात.
- गणेश वाघमोडे यांच्या या अतुलनीय कामगिरीची शासना ने अधिकृत दखल घेऊन त्यांना ‘मुख्यमंत्री शौर्यपदक’ प्र दान करण्यासाठी योग्य ती शिफारस व कार्यवाही करावी.
- तसेच पोलीस विभागाच्या वतीनेही त्यांचा विशेष सन्मान करण्यात यावा, अशी आग्रही विनंती श्री. अजय तानाजी वाघमोडे (सोलापूर जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य) यांनी निवेदनातून केली आहे.
- या मागणीचा शासन सकारात्मक विचार करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






