
साहित्यिक अरुण द. म्हात्रेंना राष्ट्रीय पुरस्कार- २०२५ प्रदान.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- रविवार दि. २७ जुलै २०२५रोजी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि जागृत नागरिक सेवा संस्था- महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वकर्मा राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
- समाजातील कला,क्रीडा, साहित्य,संपादक, पत्रकार, कृषी, उद्योग-व्यवसाय, समाजकार्य, शैक्षणिक, सांस्कृतिक, गाय क, शासकीय, निमशासकीय इत्यादी सर्व क्षेत्रात विशेष उ ल्लेखनीय, भरीव काम करणाऱ्या गुणवंतांची निवड करू न राज्यातील एकूण ६० पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

- यामध्ये जासई-उरण-रायगडचे सुपरिचित हरहुन्नरी कवी/लेखक/गायक/वाद्य वादक श्री.अरुण द.म्हात्रे यांची साहि त्य व कला भूषण राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
- कार्यक्रमाध्यक्ष मा.आमदार सतेज उर्फ बंटी पाटील – विरो धी पक्ष गटनेते विधान परिषद यांच्या शुभहस्ते अरूण द. म्हात्रे यांना पुष्पगुच्छ, शाल, सन्मान चिन्ह, मानपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
- यावेळी व्यासपीठावर सर्व मान्यवर- नाम. प्रकाश आबिट कर- आरोग्य मंत्री/ पालकमंत्री, जयंत आसगावकर- आम दार शिक्षक मतदार संघ, डॉ.रविकांत पाटील- चेअरमन ए ज्युकेशन बोर्ड पुणे, ब्रह्मकुमारी सुनंदा जी- विभागीय प्रमु ख पुणे व गोवा, विशाल घोडके- सहा. कामगार आयुक्त, अनिल म्हमाने- अध्यक्ष निर्मिती मंच, विजय शिंगाडे- काम गार कल्याण अधिकारी आदी उपस्थित होते.
- तसेच सर्व मान्यवर- स्वागतोत्सुक अध्यक्ष सुरेश केसरकर, संजय सासने, भगवान माने, अनिता काळे, अच्युतराव मा ने, श्रीकांत माजगावकर, महादेव चक्के, संभाजी थोरात, शिवाजी चौगुले, व रूपाली निकम इत्यादी कार्यकारी सदस्य उपस्थित होते.
- पुरस्कारार्थी आणि त्यांची मित्रमंडळी नातेवाईक, कार्यका री सदस्य, तसेच रसिक प्रेक्षक यांनी सदर सभागृह खच्चू न भरले होते.
- सुनियोजित आखणीने कार्यक्रम आनंदात व मोठ्या उत्सा हात पार पडला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अरूण द.म्हात्रे यां चे सर्व स्तरातून कौतुकासह गौरव होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











