सुपरिचित कवी/गायक अरुण द. म्हात्रे “राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार- २०२५. ने सन्मानित.

  • प्रतिनिधी : पुणे : प्रमोद तरळ :- रविवार दि.२४ ऑगस्ट २०२५ सुपरिचित मा.अरुण दत्ताराम म्हात्रे. यांना पुणे येथे “राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
  • मान्यताप्राप्त साऊज्योती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे धडाडीचे कार्यकारी संस्थापक माननीय सचिन ह ळदे आणि कार्यकारी सदस्य मा.दीपक राणे, विकास उबा ळे, सचिन सोनकांबळे, शीतला उबाळे यांनी सदर पुरस्का र वितरण सोहळा वि.का.राजवाडे सभागृह, भारत इतिहा स संशोधन मंडळ- पुणे येथे आयोजित केला.
  • या अभूतपूर्व सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, खासदार निलेश लंके व नागेश पाटील आष्टीकर यांचे शुभेच्छा व अभिनंदन पत्र लाभले.
  • तसेच दिग्गज मान्यवर- बाळराजे वाळुंजकर, विष्णू देशमु ख, हिमांशू जैन, चित्रा दीक्षित, भक्ति साधू, नीता शेळके, सचिन देवरे, आम्रपाली पारवे, पूजा माळी, सोनल मेश्राम. यांची उपस्थिती लाभली.
  • उपस्थित मान्यवर व आयोजकांच्या हस्ते छत्रपती- शिवरा य,शाहू महाराज, म.ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहा र अर्पण करून राष्ट्रगीत झाले.
  • तदनंतर श्री.अरुण द.म्हात्रे. यांनी आपल्या सुमधुर आवा जात स्वागत गीत सादर केले. समाजातील ज्ञान, कला,क्री डा, मनोरंजन, शैक्षणिक, साहित्य, राष्ट्रीय कर्तव्य, समाज कार्य इत्यादी विविध कार्य क्षेत्रांतील वैशिष्ट्यपूर्ण, ठळक आणि भरीव कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र आणि महारा ष्ट्राबाहेरील १२६ मान्यवरांची निवड करण्यात आली होती.
  • यामध्ये जासई-रायगड-महाराष्ट्र चे कवी/गायक अरुण द. म्हात्रे. यांची गायन, वादन, कवी, साहित्यिक, सामाजिक अशा “अष्टपैलू राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कारसाठी” निवड करण्यात आली.
  • सर्व पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मा न चिन्ह देऊन आदरपूर्वक सन्मानित करण्यात आले.
  • मान्यवरांनी आपल्या मनोगतात आयोजकांचे आणि पुर स्कारार्थींचे भरभरून कौतुक आणि शुभेच्छांसह अभिनं दन केले.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा गुंजाळ व उमाकांत आदमा ने यांनी सुंदर शब्दात केले. पुरस्कारार्थी, नातेवाईक, मित्र‌ मंडळी आणि रसिक जन यांनी सभागृह खच्चून भरले होते.
  • शेवटी आभार प्रदर्शनाने सदर भव्य दिव्य सन्मान सोह ळ्याची आनंदमय वातावरणात सांगता झाली. राष्ट्रीय भा रत भूषण पुरस्कार प्राप्त मा. अरुण द.म्हात्रे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles