दि. ९ जून २०२५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा.

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- दि. ९ जून २०२५ शिक्षक,शि क्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी विवि ध प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा पालघर लोकसभा खास दार डॉ.हेमंत सवरा यांनी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमं त्री मा.ना.डॉ.पंकज भोयर यांचा कडे केली मागणी.
  • राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री मा.ना.डॉ.पंकज भोयर हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जि ल्ह्याच्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळेस डॉ हेमंत सवरा यांनी प्रत्येक्ष भेटून निवेदनवारे मागणी केली.
  • शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांच्या अडचणींवर शासनाने तत्परता दाखवून सकारात्मक निर्णय घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
  • या मागण्यांमध्ये खालील मुद्दे विशेष महत्वाचे आहेत:
  • 1. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार झालेली संच मान्यता रद्द करावी.
  • 2. सातव्या वेतन आयोगातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर त्रुटींवर त्वरित सुधारणा करावी.
  • 3. पालघर जिल्हा व ग्रामीण भागातील अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबवावी.
  • 4. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करावी.
  •  5. शाळांना सुधारित सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाबाहेरील अनुदान प्रदान करावे.
  • 6. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये टप्पा वाढ नैसर्गिकरित्या नियमित दिला जावा.
  • 7. विनाअनुदानित शाळांमधून अनुदानित शाळांमध्ये बदली मान्यता आणि शालार्थ आयडीची ऑनलाईन अंमलबजावणी सुनिश्चित करावी.
  • 8. MMRDA क्षेत्रांतर्गत शाळांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना ३०% घरभाडे भत्ता लागू करावा.
  • 9. शालेय कर्मचारी बिंदूनामावलीची तातडीने तपासणी करावी आणि पेसा दाखला ऑनलाईन उपलब्ध करून द्यावा.
  • 10. वैयक्तिक मंजुरी प्रस्ताव व शालार्थ आयडीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करावी.
  • 11. माध्यमिक विभागातील मंजूर कर्मचाऱ्यांची नियुक्ती तात्काळ करावी.
  • 12. ग्रामीण भागातील मुलींप्रमाणेच मुलांनाही मोफत एस.टी. बस पास योजना लागू करावी.
  • 13. SC,OBC व EWS घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून वस्तीगृहांची स्थापना करावी.
  • 14. शिष्यवृत्ती रकमांमधील कपात तात्काळ भरून काढावी.
  • या मागण्या केवळ शिक्षक, कर्मचारी वा विद्यार्थ्यांपुरत्या मर्यादित नसून, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या मजबुतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत.
  • त्यामुळे शासनाने या समस्यांकडे गांभीर्याने पाहून त्वरित सकारात्मक तोडगा काढणे आवश्यक आहे, असे निवेदना त आवर्जून नमूद करण्यात आले आहे.
  • खासदार जनसंपर्क कार्यालय, वाडा
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles