पाइपलाइनचा वॉल काढण्यावरून भावंडांवर गोळीबार; परंडा तालुक्यातील घटना : कोणीही जखमी नाही, बंदुकीची गोळी जप्त.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील भांडगाव येथे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाईप लाईनचा वॉल काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातू न एकाने गावठी पिस्तुलमधून दोघा भावंडांवर गोळीबार केला.
  • सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नसले तरी या घटने नंतर सदरील दोघत्त भावंडांनी ऊसाच्या शेतात धाव घेऊ न आपला जीव वाचवला.
  • घटनेची माहिती समजताच परंडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत पिस्तुलमधील एक गोळी जप्त केली आहे.
  • तसेच आरोपीस गजाआड करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्या तील सिरसाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाई पलाईनचे एअर वॉल काढण्याचे काम भांडगाव शिवारात दि.१३ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुरू होते.
  • यावेळी सदरील वॉल काढण्याच्या कारणावरून भांडगाव येथील आरोपी महेश विठ्ठल राऊत (वय ३६) हा भांडण करू लागला.
  • यावेळी फिर्यादी धनाजी अंबऋषी राऊत यांच्यासह त्यांचे भाऊ सतीश राऊत व हनुमंत राऊत यांनी त्याला भांडण तंटा करू नको असे म्हणुन समजावण्याचा प्रयत्न केला.
  • यावेळी आरोपी महेश हा तुम्हाला बघतो असे म्हणुन तेथू न रागाने त्याच्या घराकडे गेला व थोड्याच वेळात पुन्हा माघारी आला.
  • यावेळी त्याने हातात गावठी पिस्तुल घेऊन येत लिंबाच्या झाडाजवळून फिर्यादी यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.
  • मात्र, गोळीबार झाला नाही त्यामुळे आरोपीने पिस्तुलची पट्टी मागे पुढे केली असता त्यातुन एक गोळी खाली पडली.
  • यावेळी पिस्तूल व त्याचा आवाज ऐकून फिर्यादीसह त्यां चा भाऊ जवळच्या उसाच्या शेतात जाऊन लपल्याने पुढील अनर्थ टळला.
  • याप्रकरणी धनाजी राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी महेश राऊत याच्याविरोधात परंडा पोलीस ठाण्या त गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी महेश यास अटक केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles