
अखिल भारतीय मदारी समाज सामाजिक संघटनेचा समाजाचा शिवसेनेला पाठिंबा; जबदक हाम जिंदा है तबतक हाम जाकीर भाई सौदागर के सात रहीगे.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :-नगरपरिषद निवडणू कीच्या अंतिम टप्प्यावर अखिल भारतीय मदारी समाज सामाजिक संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर सौदागर यांना जाहीर पाठिंबा दर्शवून मोठे शक्ती प्रदर्शन केले.
- मदारी समाजाच्या पाठिंबामुळे प्रभाग क्रमांक १ व ५ मधी ल शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मोठे बळ प्राप्त झाले आहे.
- शुक्रवार दि. २८ रोजी दुपारी माजी नगराध्यक्ष जाकीर सौ दागर यांच्या निवासस्थानी अश्विल भारतीय मदारी सामा जिक संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सौदागर यांची भेट घेतली.

- शिवसेनेचे शहर संघटक बाजीद दखणी, प्रभाग क्रमांक १ चे उमेदवार संजय घाडगे, समाजसेवक शरीफ तांबोळी, प्र भाग क्रमांक ५ चे उमेदवार सत्तार पठाण, संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे, गणेश राशनकर, किर ण डाके यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन शिवसेनेला जाहीर पाठिंबा दर्शविला.
- त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मदारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि सर्वसमावेशक कामासाठी जाकिरभाई सौदागर यांच्या ने तृत्वावर मदारी समाजाचा पूर्ण विश्वास आहे.
- त्यांच्या पुढाकारातून समाज हिताचे अनेक प्रश्न मार्गी ला गले आहेत. उर्वरित प्रश्न तेच मार्गी लावू शकतात याची आमच्या समाजाला खात्री आहे.
- त्यामुळे परंडा शहरातील सर्व मदारी समाज नगराध्यक्षप दाचे उमेदवार जाकीरभाई सौदागर व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना परंडा नगरपरिषद निवडणुकीत पाठिंबा देत असल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे.
- पत्रावर संघटनेचे अध्यक्ष मौलाना समीर मदारी, उपाध्यक्ष नूर मदारी, रियाज मदारी, शफिक मदारी, मुस्तफा मदारी, मोहम्मद मदारी, आसिफ मदारी, रेहान मदारी, रशीद मदा री,रखान मदारी, अस्तर मदारी, हसन मदारी, जुबेर मदारी, उस्मान मदारी, रज्जाक मदारी, जिलानी मदारी, अली मदा री, अश्फाक मदारी, बुरहान मदारी, याकुब मदारी, मुजाहि द मदारी, गुलाम मदारी, अफजल मदारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
- मदारी समाजाच्या प्रभाग क्रमांक ५ व प्रभाग क्रमांक १ म ध्ये नागरी वस्त्या असून, मदारी समाज संघटनेच्या पाठिं ब्यामुळे या दोन्ही प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार जाकीर सौदागर यांना मोठे पाठबळ मिळणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











