माणकेश्वर महादेव मंदिरात भाविकांना अडवू नकोस, अन्यथा हातपाय तोडीन…!मंदिरातील कंत्राटी पहारेकऱ्याला शिवीगाळ; जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी परंडा पोलिसांत गुन्हा दाखल.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- धाराशिव जिल्ह्या तील प्रसिद्ध श्रीक्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिरात कर्तव्य ब जावणाऱ्या कंत्राटी पहारेकऱ्याला शिवीगाळ करून हात पाय तोडण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
  • बकरे घेऊन येणाऱ्या भाविकांना मंदिरातून बाहेर काढू नये, असे सांगत पहारेकऱ्याला धमकावण्यात आल्याचा आरोप आहे.
  • या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास हणुमंत यादव (वय ३२, रा.माणकेश्वर, ता.भूम, जि.धाराशिव) हे पुरातत्त्व विभागांतर्गत श्रीक्षेत्र महादेव मंदिर माणकेश्वर येथे कंत्राटी पहारेकरी म्हणून कार्यरत आहेत.
  • दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.५० वाजण्या च्या सुमारास रोहिदास यादव हे मंदिरात आपले कर्तव्य बजावत असताना बाळासाहेब गिना निमटके (रा. माणके श्वर) यांनी त्यांना बकरे घेऊन येणाऱ्या भाविकांना मंदिरा तून बाहेर काढू नये किंवा त्यांना काही सांगू नये, असे म्हणत शिवीगाळ केली.
  • तसेच, यापुढे भाविकांना अडविल्यास हातपाय तोडून टा कीन आणि जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
  • सटवाई देवी ट्रस्ट मंडळाचा उल्लेख करून पुरातत्त्व वि भागाच्या कर्मचाऱ्यांनाही धमकावल्याचा आरोप आहे.
  • या घटनेनंतर रोहिदास यादव यांनी परंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
  • त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाळासाहेब गिना निम टके यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९६, २२१, ३५१ (२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक काकडे है तपास करीत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles