प्रयोगशील शेतकरी गोरक्षनाथ भांगे यांना राज्यस्तरीय ‘महात्मा फुले युवा कृषिरत्न पुरस्कार’ प्रदान…!

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-कृषी क्षेत्रात नावीन्य पूर्ण प्रयोग करून स्वयंपोषी शेतीचा आदर्श निर्माण कर णारे तसेच समाजसेवेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना मोफत सेवा देणारे विठ्ठलवाडी येथील प्रयोगशील शेतकरी व संशोधक गोरक्षनाथ भांगे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय ‘महात्मा फुले युवा कृषिर त्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
  • बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
  • त्यांच्या कृषी व सामाजिक क्षेत्रातील बहुआयामी कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
  • गोरक्षनाथ भांगे यांनी अवघ्या तीन गुंठे जागेत कुटुंबासाठी ७५ प्रकारच्या पिकांची लागवड करून स्वयंपोषी शेतीचा अभिनव प्रयोग यशस्वी केला आहे.
  • बांधावरील वृक्षलागवडीतून ‘फिक्स डिपॉझिट’ ही संकल्प ना त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे.
  • तसेच देशी बियाण्यांची लागवड, पारंपरिक बियाण्यांचे सं वर्धन व बियाणे बँकेच्या माध्यमातून त्यांचा प्रसार करण्या चे महत्त्वपूर्ण कार्य ते करीत आहेत.
  • याशिवाय रुद्राक्ष ॲक्युप्रेशर थेरपीच्या माध्यमातून साडे तीन हजारांहून अधिक रुग्णांना त्यांनी मोफत सेवा दिली आहे.
  • शेती प्रकल्पाचे राज्यस्तरीय प्रशिक्षक तसेच ‘यशदा’चे राज्यस्तरीय प्रवीण प्रशिक्षक म्हणूनही ते कार्यरत आहेत.
  • पोषण अभियानांतर्गत आरोग्यदायी परसबाग लागवड, शे तमालाचे मूल्यवर्धन (व्हॅल्यू ॲडिशन) आणि शाश्वत शेती विषयी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles