मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटकाः आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, 892 घरांची पडझड; जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले.

  • प्रतिनिधी : छ.संभाजीनगर : संदीप कारके :- मराठवा ड्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याची गंभीर आकडेवारी समोर आली आहे.
  • या पावसामुळे विभागात एकूण 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.
  • एकूण 892 हून अधिक घरांची पडझड झाली असून, अने क ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
  • मानवी हानीचा विचार केल्यास, अतिवृष्टीत झालेल्या 6 मृ त्यूंपैकी नांदेड जिल्ह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर धाराशिव जिल्ह्यात 3 जण वाहून गेले. नांदेड आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
  • याव्यतिरिक्त, धाराशिव जिल्ह्यात 5, तर बीड जिल्ह्यात 1 व्यक्ती जखमी झाली आहे. जीवित हानीबरोबरच पशुधना चेही मोठे नुकसान झाले असून, विभागात एकूण 213 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.
  • यामध्ये धाराशिवमध्ये सर्वाधिक 81 आणि जालना जि ल्ह्यात 40 जनावरांचा समावेश आहे.
  • दगावलेल्या जनावरांमध्ये दुधाळ (98 मोठी, 86 लहान) आणि ओढकाम करणाऱ्या (25 मोठी, 7 लहान) जनावरां चा समावेश आहे.
  • अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील एकूण 892 खासगी माल मत्तांची पडझड झाली आहे. यात धाराशिव जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, येथे 611 घरांचे नुकसान झाले आहे.
  • याशिवाय, लातूरमध्ये 89, छत्रपती संभाजीनगरमध्ये 73, नांदेडमध्ये 56, परभणीमध्ये 42 आणि जालन्यात 21 घ रांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
  • खासगी मालमत्तेसोबतच सार्वजनिक सुविधांचाही मोठा फटका बसला असून, मराठवाड्यात एकूण 9 पूल वाहून गेले आहेत.
  • यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये प्रत्येकी 4, तर परभणीतील एका पुलाचा समावेश आहे.
  • या व्यतिरिक्त, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 4 रस्ते वाहू न गेल्याने वाहतूक खंडित झाली आहे.
  • शैक्षणिक सुविधांमध्येही नुकसान झाले असून, धाराशिव मधील 6 आणि छत्रपती संभाजीनगरमधील 2 अशा एकू ण 8 शाळांचेही नुकसान झाले आहे.
  • मराठवाड्याला बसलेल्या या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे तातडीने मदतकार्य आणि पुनर्वसन करण्याची गरज निर्मा ण झाली आहे.
  • गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे.
  • त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस सुरू अ सल्याने गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमा णात वाढली आहे.
  • यामुळे मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवा डी धरणात पाण्याची आवक लक्षणीय वाढली आहे. परि णामी, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.
  • जायकवाडी धरणाच्या 27 दरवाजांतून 2.92 लाख क्युसे क वेगाने विसर्ग सुरू सध्या जायकवाडी धरणातून 2लाख 92 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
  • धरणाचे एकूण 18 नियमित आणि 9 आपत्कालीन दरवा जे (एकूण 27 दरवाजे) उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
  • पुढे नांदेड जिल्ह्यातही पाऊस सुरू असल्याने गोदावरी न दी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांच्या शेतां मध्ये पाणी साचल्याची माहिती आहे.
  • नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे पुढील२४ तास गोदावरी नदीकाठच्या लोकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles