
अनधिकृत A/C वापर प्रकरण – वसई उपनिबंधकास अंतिम इशारा, आंदोलनाची तयारी…!
- प्रतिनिधी : अनंत पाटील :- वसई येथील उपनिबंधक,स हकारी संस्था या सार्वजनिक प्राधिकरण कार्यालयात शा सन निर्णय दि. 25 मे 2022 चे उघड उल्लंघन झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
- या निर्णयानुसार केवळ S-30 वेतनस्तर (₹1,44,200 ते ₹2,18,200) अथवा त्यापेक्षा उच्च वेतनश्रेणीतील अधि काऱ्यांनाच वातानुकूलन (A/C) सुविधेचा लाभ घेण्याची परवानगी आहे.

- तथापि, उपनिबंधक कार्यालयात ही अट पूर्ण न करताही A/C यंत्र कार्यरत स्थितीत आढळून आले.
- माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकार अनंत पुंडलिक पा टील (कार्याध्यक्ष – पालघर जिल्हा, माहिती अधिकार का र्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य) यांनी प्रत्यक्ष पाहणीत स दर A/C कार्यरत असल्याचे नोंदवले असून, संबंधित अ धिकाऱ्याने स्वतः कबूल केले आहे की हे यंत्र त्यांच्या पद भार स्वीकृतीपूर्वीपासूनच कार्यरत आहे.
- या कबुलीचा व्हिडीओ पुरावा उपलब्ध आहे.
- श्री.अनंत पाटील यांनी दिला अंतिम इशारा :-
- “सदर बेकायदेशीर A/C दोन दिवसांच्या आत काढून टा कावा, अन्यथा मी असंख्य कार्यकर्त्यांसह उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन व उपोषणास बसणार आहे.
- या आंदोलनातून उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस संबंधित अधिकारी स्वतः जबाबदार राहील.”
- या प्रकरणातील पुरावे विभागीय आयुक्त, कोकण विभाग तसेच मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठवले जात आहेत.
- हे प्रकरण केवळ एका अधिकाऱ्याच्या गैरवर्तनाविरोधात नसून, संपूर्ण सरकारी यंत्रणेत होणाऱ्या नियमभंग व सार्व जनिक मालमत्तेच्या गैरवापराविरोधात आहे.
- माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा इशारा आहे की, जर शास न निर्णयांचे उल्लंघन केले गेले,तर प्रशासकीय शिस्त, सेवा आचारसंहिता आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
- त्यामुळे जनहितासाठी या प्रकरणावर तातडीने कारवाई होणे अत्यावश्यक आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











