
परंडा तालुक्यातील कुंभेजा येथे सशस्त्र दरोडा; माजी सैनिक गंभीर जखमी; दरोडेखोरांचा शेतवस्तीवर थरार; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास, परिसरात भीतीचे वातावरण.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- तालुक्यातील कुंभे जा परिसरातील कॅनल पट्टीजवळ असलेल्या एका शेत वस्तीवर मध्यरात्री ५ ते ६ सशस्त्र दरोडेखोरांनी भीषण दरोडा टाकला.
- या घटनेत घराचे मालक तथा माजी सैनिक विश्वनाथ जग ताप (वय ७० वर्षे) दरोडेखोरांशी दोन हात करताना गंभीर जखमी झाले आहेत.

- दरोडेखोरांनी घरातील लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटून पो बारा केला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री १२.३० वा जेच्या सुमारास अज्ञात ५ ते ६ सशस्त्र दरोडेखोरांनी कॅनल पट्टी लगत असलेल्या जगताप यांच्या वस्तीवर हल्ला केला.

- दरोडेखोर घरात घुसल्यानंतर जगताप यांनी त्यांना प्रति कार करण्याचा प्रयत्न केला.
- यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी त्यांच्यावर धार दार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात विश्वनाथ जगताप हे रक्ताच्या थारोळ्यात पडले.
- घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

- घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जखमी जगताप यांना तात्काळ परंडा व त्यानंतर बार्शी येथील रुग्णालयात हलवले.
- मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारा साठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- पोलीस प्रशासनाकडून तपासाची चक्रे वेगवान
- घटनेचे गांभीर्य ओळखून परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

- पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
- महावितरणवर नागरिकांचा संताप
- या घटनेमुळे कुंभेजा परिसरात घबराटीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी परिसरात वीज पुरवठा खं डित होता.
- ‘रात्रीच्या वेळी वीज नसल्याचा फायदा दरोडेखोरांना मि ळाला’ असा आरोप करत स्थानिक नागरिकांनी महावितर ण कंपनीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

- वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळेच अशा घटनां ना वाव मिळत असल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






