
कुंभेफळ (ता.परंडा) येथील शेतकरी सिद्दिक उस्मान शेख यांचे महसूल मंत्र्यांना पत्र: ८ वर्षे झाली तरी शेत रस्त्याचा प्रश्न प्रलंबित…!
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कूभेफळ ता .परंडा येथे शेत रस्त्याचा वाद गेल्या ८ वर्षांपासून प्रलंबित अस ल्याने आणि वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिज वूनही न्याय मिळत नसल्याने, कुंभेफळ (ता.परंडा) येथील शेतकरी सिद्दिक उस्मान शेख यांनी अखेर राज्याच्या मह सूल मंत्र्यांकडे पत्राद्वारे दाद मागितली आहे.
- ‘आठ-नऊ वर्षे होऊनही निकाल लागत नसेल तर शेतक ऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे?’ असा उद्विग्न सवाल त्यांनी या पत्रातून उपस्थित केला असून, हा रस्ता तात्का ळ खुला करून देण्याची मागणी केली आहे.

- प्रकरणाची पार्श्वभूमी आणि कायदेशीर प्रवास२०१८ मध्ये मागणी: शेतकरी सिद्दिक उस्मान शेख यांनी कुंभेफळ ये थील गट नंबर ३४ मधील स्वतःच्या शेतात जाण्या-येण्या साठी २०१८ मध्ये परंडा तहसीलदार कार्यालयाकडे रीत सर रस्त्याची मागणी केली होती.
- तहसीलदारांचा निकाल: तत्कालीन तहसीलदारांनी/मंडळ अधिकारी/ तलाटी यांणी स्वतः स्पॉट पंचनामा करून का गदपत्रे आणि परिस्थिती पाहून शेतकरी सिद्दिक शेख यां च्या बाजूने सकारात्मक निकाल दिला होता.
- तहसीलदारांच्या या निर्णयाविरोधात विरोधकांनी उपवि भागीय अधिकारी (भूम) यांच्याकडे अपील दाखल केले.
- मात्र, भूम येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनीही शेख यांच्या बाजूने निकाल दिला.
- विरोधाकाला उपविभागीय अधिकाऱ्यांचा निर्णय मान्य न सल्याने विरोधकांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय (धाराशिव) येथे अपील केले.
- हे प्रकरण सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित असू न त्यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
- शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे जायच ?’गेल्या ८ वर्षांपासून हा खटला वेगवेगळ्या महसुली न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे.
- एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात तिसरया कोर्टात चालू आहे . तारखा वर तारखा पडत असल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे.
- शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने वहिवाट करणे आणि शेतीतील पिके बाहेर काढणे शेतातिल माल बाहेर काडने अत्यंत कठीण झाले आहे.
- महसूल मंत्र्यांकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणीवारंवार न्याय मिळण्यास विलंब होत आसून तारीक पे तरीक घे ण्यास प्रसासन जोमात शेतकरी कोमात असल्याने शेतक री सिद्दिक उस्मान शेख यांनी थेट महसूल मंत्री/मा.जिल्हा धिकारी कार्यालय धाराशिव / तहसीलदार परंडा यांना पत्र पाठवले आहे.

- “जर एखाद्या छोट्या शेत रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्या ला ८ ते ९ वर्षे लढावे लागत असेल,तर सामान्य शेतकऱ्या ने जगायचे कसे?” असा सवाल त्यांनी पत्रात केला आहे.
- या अर्जाची तात्काळ दखल घेऊन प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निकाल लावावा आणि शेत रस्ता तात्काळ खुला करून देण्यात यावा, अशी हाक त्यांनी प्रशासनाला व महसूल मंत्र्यांना दिली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






