बिभिषण रोडगे यांना राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान; मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-शिक्षण आणि सामा जिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बिभिषण गणपती रोडगे यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार – २०२६’ प्रदान करून गौरवण्यात आले.
  • मुंबईतील आझाद मैदान येथील मराठी पत्रकार भवनात ए कता सेवाभावी संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजि त भव्य सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला.
  • महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, आ मदार विक्रम काळे, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अली खान, ज्येष्ठ अभिनेते सुधाकर शर्मा (नामवंत गीतकार) आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते रोडगे यांना हा पुरस्का र सुपूर्द करण्यात आला.
  • बिभिषण रोडगे यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले अमूल्य योग दान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेले नावी न्यपूर्ण उपक्रम आणि सामाजिक बांधिलकीची दखल घे ऊन संस्थेच्या वतीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना रोडगे म्ह णाले, “हा सन्मान केवळ माझा नसून माझे कुटुंब, सहका री, विद्यार्थी,पालक आणि मित्रपरिवार यांच्या खंबीर साथी चे आणि सहकार्याचे हे फलित आहे.
  • “या सोहळ्याला राज्यभरातून आलेले विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजसेवक, शिक्षक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • उपस्थित पाहुण्यांनी पुरस्कारार्थींच्या कार्याचे विशेष कौतु क केले आणि शिक्षण क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
  • रोडगे यांना मिळालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील बहुमानाबद्द ल त्यांच्या मूळ परिसरातून आणि सर्व स्तरांतून अभिनंद नाचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles