
महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह गौरव सत्कार संपन्न.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथील स्थानि क महात्मा गांधी विद्यालयात फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, एन.एम.एम.एस. (NMMS) परीक्षाधारक आणि शिष्यवृ त्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह जाहीर सत्कार समारंभ आज दिनांक २० जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
- या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्या ध्यापक बाळासाहेब काशीद सर होते.

- तर प्रमुख पाहुणे म्हणून परंडा तालुक्याचे गटविकास अ धिकारी (BDO) रवींद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवी ण शिरसाट आणि पंचायत समितीच्या सभापती सौ. अनि ता जाधव मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
- यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व गुणवंत वि द्यार्थी आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या पालकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
- विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी अहोरा त्र कष्ट घेणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचाही याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.
- यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी रवींद्र जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, भविष्यातील सुवर्णसं धी आणि पुढील उच्च शिक्षणाबाबत अत्यंत मोलाचे मार्ग दर्शन केले.
- विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून जिद्दीने अभ्यास करा वा, असे आवाहन करत त्यांनी सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- या गौरव सोहळ्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्ष केतर कर्मचारी, मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उप स्थित होते.
- कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन किरण ठानांबीर यांनी के ले, तर उपस्थितांचे आभार मानून मुख्याध्यापक बाळासा हेब काशीद यांनी अध्यक्षाीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप केला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






