माहिती अधिकार नियमावलीला स्थगिती; अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मोठे यश.

  • प्रतिनिधी : भारत अंकुश साळुंके :- पारनेर, दि. ३ जुलै माहितीचा अधिकार (RTI) कायद्याशी संबंधित राज्य शा सनाने लागू केलेल्या नव्या नियमावलीला स्थगिती देण्या चा निर्णय घेतल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यां च्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्या मा गण्यांची दखल घेत हा निर्णय जाहीर केल्याने राज्यभराती ल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
  • माहिती अधिकार कायद्यातील पारदर्शकता आणि नागरि कांचे हक्क अबाधित राहावेत, या मागणीसाठी अण्णा ह जारे यांनी ५ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.
  • त्यांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने नव्या नियमाव लीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
  • त्यामुळे प्रस्तावित उपोषण टळले असून राळेगणसिद्धी येथे ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.
  • अण्णा हजारे यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत हा निर्णय लोकशाही, जनतेचे हक्क आणि सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली.
  • माहिती अधिकार कायद्याची मूळ भावना कायम ठेवण्या साठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
  • दरम्यान, माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि विविध स्तरातील नागरिकांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले असून, नागरिकांच्या माहितीच्या अ धिकाराचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे मत व्यक्त केले आहे.
  • शासनाने संबंधित नियमावलीबाबत सर्व संबंधित घटकां शी चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्य क्त केली जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles