परंडा-धाराशिवच्या ग्रामीण आरोग्याला मिळणार नवा बूस्टर….! डॉ.तानाजीराव सावंत अन् उमेश सोनवणे यांच्यात हायव्होल्टेज भेट.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- ग्रामीण भागातील मोडकळीस आलेली आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा भक्कम रुळावर आणण्यासाठी आणि सामान्य माणसाला वेळेवर उपचार मिळवून देण्यासाठी शिवसेनेने आता कंबर कस ली आहे.
  • शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे धडपडे आणि आक्रमक युवा नेते उमेश सोनवणे यांनी नुकतीच पुणे येथील मध्यवर्ती कार्या लयात माजी आरोग्यमंत्री आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांची ‘हायव्होल्टेज’ भेट घेतली.
  • या भेटीत कोणत्याही औपचारिक गप्पांऐवजी थेट ‘ग्राऊंड रिॲलिटी’ आणि ग्रामीण भागातील आरोग्याच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
  • थेट संवादाची हमी अन् तातडीने प्रश्न मार्गी लावण्याचे नि र्देश ग्रामीण भागातील आरोग्यसेवेत अडथळा आणणा ऱ्या विविध त्रुटींवर बोट ठेवत उमेश सोनवणे यांनी या बैठकीत आक्रमक भूमिका मांडली.
  • माजी आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद. “
  • नागरिकांना उपचार मिळवून देताना कुणी अडवणूक कर त असेल किंवा अडचणी येत असतील, तर अजिबात घाबरू नका.
  • कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट माझ्याशी संपर्क साधा,तो प्रश्न तात्काळ मार्गी लावू!” असा थेट शब्द डॉ. सावंत यांनी सोनवणे यांच्या पाठीवर हात ठेवत दिला.
  • या महत्त्वपूर्ण बैठकीतील ३ मोठे हायलाईट्स:
  • थेट संवादाची हमी: आरोग्य सेवेतील त्रुटी दूर करण्यासा ठी युवा नेत्याला माजी आरोग्यमंत्र्यांकडून थेट संपर्काचे व पाठबळाचे स्पष्ट निर्देश.
  • ऑर्गनायझेशनल नेटवर्क: शिवसेनेच्या तालुका व जिल्हा पातळीवरील आरोग्य नेटवर्कला अधिक सक्रीय करून शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार.
  • परंड्याला प्राधान्य: परंडा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) आणि ग्रामीण रुग्णालयां ची (RH) स्थिती सुधारण्यावर विशेष भर दिला जाणार.
  • शिवसेनेचा ‘आरोग्य मास्टरप्लॅन’
  • या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील शासकीय आरोग्य योजनां चा लाभ प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी शिव सेनेच्या तालुका व जिल्हा पातळीवरील नेटवर्कला अधिक सक्रीय करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांची दुरवस्था सुधारण्यावर या मा स्टरप्लॅन अंतर्गत विशेष भर दिला जाणार आहे.
  • “आरोग्यसेवा हे केवळ काम नसून सामाजिक कर्तव्य आ हे,” अशी भावना व्यक्त करत डॉ. तानाजीराव सावंत यांनी उमेश सोनवणे यांच्या जनहितार्थ सुरू असलेल्या आक्रम क पाठपुराव्याचे कौतुक केले.
  • केवळ बैठका आणि आश्वासने न देता प्रत्यक्ष कामावर भ र देण्याच्या डॉ.सावंत यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि सोन वणे यांच्या धाडसी नियोजनामुळे परंडा तालुक्यातील आ रोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे.
  • या ‘पावरफुल’ भेटीनंतर आता प्रत्यक्ष मैदानावर आरोग्य व्यवस्थेत काय सकारात्मक बदल घडतात, याकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles