सोनारी जि.प.शाळेला नागरीकांनी लावले कुलूप; रिक्त पदांसाठी उद्यापासून धाराशिव जि.प.मध्ये ठिय्या आंदोलन. 

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्ष क व इतर रिक्त पदे चार वर्षांपासून भरली न गेल्यामुळे ग्रामस्थांचा रोष तीव्र झाला आहे.
  • प्रशासनाच्या चालढकल भूमिकेमुळे संतप्त झालेल्या ग्रा मस्थांनी गुरुवारी शाळेला कुलूप लावून शाळा पूर्णपणे बंद ठेवली आहे.
  • शाळेतील रिक्त पदांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही, तो पर्यंत आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून, या आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्या साठी शुक्रवार 30 जुलै पासून धाराशिव जिल्हा परिषद कार्यालयात धडक देण्यात येणार आहे.
  • शिक्षक व इतर सर्व रिक्त पदांची कायदेशीर व कागदपत्रां ची पूर्तता होईपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयीन दालनात शेक डोच्या संख्येने पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी ठिय्या आं दोलन करणार आहेत.
  • चार वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी होत असलेल्या खेळामुळे सोनारी गावात प्रशासनाविषयी प्रचं ड रोष निर्माण झाला असून, उद्या होणाऱ्या या धडक आं दोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
  • याबाबत 28जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) , शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहेत.
  • कोट..
  • ​गेल्या चार वर्षांपासून आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाला आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची किंमत कळलेली नाही.
  • निवडणुका असोत वा समुपदेशन बैठका, आम्हाला केव ळ आश्वासने मिळतात; पण प्रत्यक्षात शिक्षक मिळत नाहीत.
  • ९ जुलैच्या बैठकीतील तोंडी आदेशानंतरही संगनमत क रून नियुक्ती बदलली जात असेल, तर हा सरळ सरळ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे.
  • जोपर्यंत आमच्या शाळेला कायमस्वरूपी शिक्षक व इतर पदे मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.
  • उद्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या दालनात शेकडो पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी तीव्र ठिय्या आंदोलन करतील आणि यापुढील सर्व शैक्षणिक व कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाची जबाबदारी प्रशासनाची असेल.
  • दीपक सुरवसे, शाळा व्यवस्थापन समिती (माध्यमिक) अध्यक्ष
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles