
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीविरोधात युवकांचा एल्गार….!शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिने लोटले, मात्र महत्त्वाच्या विषयांची एकही तासिका नाही…!”
- प्रतिनीधी : स्वरूप गावडे :- आलापल्ली येथील राजे ध र्मराव कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे, ता सिका न होणे तसेच विद्यार्थ्यांच्या वेळेतील बदलामुळे नि र्माण झालेल्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेध ण्यासाठी आलापल्लीतील जागरूक युवकांनी पुढाकार घेतला.
- युवकांनी गुरुवारी महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना नि वेदन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी तातडीने उपा ययोजना करण्याची मागणी केली.

- महाविद्यालयात शिक्षकांची एकूण पाच पदे रिक्त असून न वीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन जवळपास दोन महिने झा ले असतानाही इयत्ता ११ वी व १२ वीच्या फिजिक्स आ णि मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयांच्या तासिका अद्याप सुरू झालेल्या नसल्याचा आरोप युवकांनी केला आहे.
- तसेच मराठी व इंग्रजी विषयांच्या तासिका माध्यमिक शा ळेतील शिक्षकांकडून कनिष्ठ महाविद्यालयात घेतल्या जा त असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
- राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे १४० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यामध्ये ११ वीचे नवीन विद्यार्थी तसे च १२ वीच्या महत्त्वाच्या वर्षातील विद्यार्थी आहेत.
- शिक्षकांची कमतरता आणि नियमित तासिका न झाल्या मुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे युवकांनी निदर्शनास आणून दिले.
- वेळेत बदलामुळे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची गैरसोय
- महाविद्यालयाची वेळ पूर्वी सकाळी ७ ते ११ अशी होती. मात्र विद्यार्थ्यांना पुरेशी पूर्वसूचना न देता महाविद्यालयाची वेळ सकाळी १० ते दुपारी २ करण्यात आल्याने बाहेरगा वाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे युवकांनी सांगितले.
- महाविद्यालय सुटल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना परतीच्या बसेस वेळेत उपलब्ध होत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
- त्यामुळे पूर्वीची वेळ पूर्ववत करण्याची मागणी विद्यार्थ्यां नी केली आहे.
- या सर्व समस्या स्थानिक युवकांच्या निदर्शनास आल्यानंत र त्यांनी ‘विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि हक्क यासाठी युवक एकत्र’ या भूमिकेतून पुढाकार घेतला.
- महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या समस्या गांभीर्याने घेऊन तातडीने निराकरण करावे, अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली.
- “येत्या ८ दिवसांत या सर्व समस्यांवर ठोस तोडगा न काढ ल्यास महाविद्यालयाला कुलूप ठोकण्याचे आंदोलन कर ण्यात येईल,” असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
- यावेळी आलापल्लीतील अनेक जागरूक युवक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी स्थानिक युव कांनी एकत्र येत घेतलेल्या या भूमिकेची परिसरात चर्चा होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






