
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, साखरेचे दर गनाला ऊसाला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल चहाचे दर वाडले.
- प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :- बाजारात साखरेच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य ग्राह कांच्या बजेटवर मोठा ताण पडला आहे.
- किरकोळ बाजारात साखरेचे दर उच्चांकी पातळीवर पोहो चल्याने ‘गोड’ साखर आता सर्वसामान्यांसाठी ‘कडू’ होऊ लागली आहे.
- एकीकडे ग्राहक साखरेच्या वाढत्या दरामुळे त्रस्त असता ना,दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पद रात अत्यंत कमी भाव पडत असल्याने बळीराजा तीव्र नाराज झाला आहे.

- कारखाने शेतकरी यांना वेळेवर बिल देत नसल्याने शेतक ऱ्यात नाराजी ‘ बाजारातील या विसंगतीमुळे “ग्राहकांचे खिसे रिकामे आणि शेतकऱ्यांचे हात रिकामे” अशी विदा रक स्थिती निर्माण झाली आहे.
- ग्राहकांच्या खिशाला कात्रीसणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच साखरेच्या दराने अचानक उसळी घेतली आहे. किरकोळ बाजारात साखरेचे दर प्रति किलो ४५ ते ५० रुपयांच्या पार गेले आहेत.
- यामुळे गृहिणींचे मासिक बजेट कोलमडले असून चहा टप ऱ्या, मिठाईचे दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांनाही या दरवाढीचा मोठा फटका बसत आहे.
- आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती आणि साखरेचा मर्यादित पुरवठा यामुळे ही दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना दैनंदिन गरजाभा गव ताना मोठी कसरत करावी लागत आहे.
- शेतकऱ्यांची व्यथा: खर्च अफाट, उत्पन्न कवडीमोल साख रेचे दर गगनाला भिडले असले तरी त्याचा कोणताही फा यदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
- चालू हंगामात खते, बियाणे, मजुरी आणि वाहतूक खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. ऊस पिकवण्यासाठी आणि तो कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा ख र्च करावा लागत आहे.
- असे असतानाही साखर कारखान्यांकडून मिळणारा ‘एफ. आर.पी’ (रास्त आणि किफायतशीर किंमत) आणि इतर बोनस अत्यंत कमी प्रमाणात मिळत आहेत.
- कारखानदार साखरेच्या वाढत्या किमतीचा नफा स्वतः ला टत असून शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भावाने समाधान मानावे लागत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.
- नफा नेमका जातोय कोणाच्या खिशात…?बाजारपेठेतील या चक्रव्यूहामुळे शेतकरी आणि ग्राहक दोन्ही बाजूंनी भरडले जात आहेत.
- साखरेचे दर वाढूनही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही, आणि ग्राहकांना मात्र चढ्या दराने खरेदी करावी लागत आहे.
- त्यामुळे साखरेच्या विक्रीतून मिळणारा वाढीव नफा नेम का साखर कारखानदार की बड्या व्यापाऱ्यांच्या खिशात जात आहे, असा संतप्त सवाल ऊस उत्पादक विचारत आहेत.
- शेतकरी संघटना आक्रमकया परिस्थितीवर नियंत्रण मिळ वण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी माग णी जोर धरू लागली आहे.
- ऊसाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा आणि साखरेच्या साठेबाजीला आळा घालून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.
- येत्या काही दिवसांत शासनाने ठोस पावले न उचलल्यास साखर कारखान्यांसमोर तीव्र आंदोलन करतील अशि शेत कऱ्यात चर्चा आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






