ग्रामपंचायतींमध्ये आता शिस्त आणि पारदर्शकता! ग्रामसेवकांची हजेरी आता थेट ‘जी.पी.एस’ आणि ‘बायोमॅट्रिक’द्वारे शासनाचे कडक आदेश.

  • प्रतिनिधी : राजाराम खांगळ :- राज्यात ग्रामीण भागात ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी वेळेवर कार्याल यात उपस्थित राहत नसल्यामुळे, तसेच मुख्यालयी न थां बल्याने नागरिकांना सातत्याने त्रास सहन करावा लागत होता.
  • या समस्येची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी जी. पी.एस आणि बायोमॅट्रिक प्रणालीद्वारे हजेरी लावणे सक्ती चे केले आहे.
  • ग्राम विकास विभागाचे कार्यासन अधिकारी “नितीन स. प वार” यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्य कारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या निर्णयाची तात्काळ व कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
  • यापुर्वी ग्रामसेवक कार्यालयात अनुपस्थित राहिल्याने दा खले, योजनांचे कामे आणि इतर शासकीय कामांसाठी ग्रा मस्थांची पायपीट होत होती ती आता थांबणार आहे.
  • यापुढे नागरिकांच्या त्रासाला आता तरी पूर्णविराम मिळे ल. यापूर्वी १० डिसेंबर २०२४ रोजी हजेरीबाबत आदेश देऊनही अनेक ठिकाणी अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
  • जीपीएस व बायोमॅट्रिक सक्तीमुळे शासनाने आता पुनश्च कडक निर्देश जारी केल्याने ग्रामसेवकांना आता ते थेट कार्यालयात/क्षेत्रात उपस्थित असल्याचे जीपीएस लोकेश न व बायोमॅट्रिकद्वारे सिद्ध करावे लागणार आहे.
  • शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रशासनात पारदर्शकता येऊन ग्रामसेवकांना वेळेवर उपस्थित राहावे च लागेल, ज्यामुळे थेट सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles