
परंडा तालुक्यात टीबी मुक्तक्ष२७ ग्रामपंचायति ते कांस्य पदक विजेत्या ६ ग्रामपंचायतिचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न.
- प्रतिनीधी : फारूख शेख :- परंडा तालुक्यातील क्षयरोग निर्मूलनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीं चा सन्मान करण्यासाठी “टीबी मुक्त ग्रामपंचायत गुणगौर व सोहळा – २०२५” पंचायत समिती सभागृह, परंडा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
- या कार्यक्रमात रौप्य पदक विजेत्या २७ ग्रामपंचायती व कांस्य पदक विजेत्या ६ ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला, तर सुवर्णपदक विजेत्या २ ग्रामपंचायतींचा सत्कार जिल्हास्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती देण्या त आली.

- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ.अर्चनाताई आण्णासाहेब जाधव उपस्थित होत्या. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.रविंद्र जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपक निंभोरकर, गटशिक्ष णाधिकारी श्री.निलेश इंगळे, तसेच पंचायत समिती सद स्य श्री.गणेश भिलारे, श्री. समाधान नलावडे, सौ.रेश्मा गा यकवाड, सौ.मालनबाई कोलते, सौ.दिपाली खुळे व सौ. मोनिका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
- याशिवाय डॉ.साचे, डॉ.लांडगे, डॉ.लोमटे, क्षयरोग पर्यवेक्ष क श्री.रामचंद्र झिंगे व श्री.दत्तात्रय आडसूळ, तसेच आरो ग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, गटपर्वतक,आशा स्वयंसेविका आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व विजेत्या ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्र,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा रौप्य अथवा कांस्य पुतळा आणि पुष्पगु च्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
- या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ग्रामपंचायतींच्या कार्याचे कौतुक करून पुढील काळातही क्षयरोग निर्मूलनासाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
- अध्यक्षीय भाषणात सौ. अर्चनाताई जाधव यांनी आशा स्वयंसेविकांना गावपातळीवर अधिकाधिक संशयित रु ग्णांचे थुंकी नमुने तपासणीसाठी पाठवून क्षयरोगाचे लव कर निदान करण्यासाठी प्रयत्न वाढविण्याचे आवाहन केले.
- गटविकास अधिकारी श्री.जाधव यांनी क्षयरोगाचे संपूर्ण उच्चाटन ही केवळ आरोग्य विभागाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
- प्रत्येक ग्रामपंचायतीने या अभियानात सक्रिय सहभाग घे ऊन परंडा तालुका टीबी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी सह कार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
- यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपक निंभोरकर सर यांनी तालुक्यातील क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाची सद्य स्थिती, उपलब्धी आणि पुढील उद्दिष्टे याविषयी सविस्तर माहिती दिली.
- तसेच टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानातील सहा प्रमुख निर्देशांक उपस्थितांना समजावून सांगत ग्रामपंचायत पदा धिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
- कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्या ग्रामपंचायती, सरपंच,उ पसरपंच ग्रामसेवक, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्म चारी आणि आशा स्वयंसेविकांचे अभिनंदन करण्यात आले.
- परंडा तालुका क्षयरोगमुक्त करण्याच्या दिशेने ग्रामपंचाय ती, आरोग्य विभाग आणि समाज यांच्यातील प्रभावी स मन्वयाचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






