
अहेरी नगरपंचायतीच्या गाईंच्या लिलावाला आक्षेप; बेकायदेशीर वाहतूक रोखण्याची मागणी.
- प्रतिनीधी : अहेरी : स्वरूप गावडे:- अहेरी नगरपंचायत हद्दीत मोकाट फिरणाऱ्या गाईंना पकडून त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
- मात्र, या लिलाव प्रक्रियेत परराज्यातील व्यक्ती सहभागी होण्याची शक्यता असल्याने लिलावानंतर गाईंची बेकायदे शीर वाहतूक होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
- या पार्श्वभूमीवर युवासेना अहेरी विधानसभा संपर्क प्रमुख सचिन दिगंबर येरोजवार यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधि काऱ्यांना निवेदन देत गाईंचे संरक्षण आणि कायदेशीर प्र क्रिया काटेकोरपणे राबविण्याची मागणी केली आहे.

- निवेदनात कोणत्याही व्यक्तीवर पूर्वग्रहदूषित आरोप कर ण्यात आलेले नसून,गाईंचे संरक्षण व कायद्याचे पालन व्हा वे, या उद्देशाने ही मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट कर ण्यात आले आहे.
- लिलावापूर्वी संबंधित सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच लिलावात सहभागी होणाऱ्या खरेदीदारांची ओळ ख, पत्ता व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
- लिलावामध्ये गाई कतलीसाठी किंवा बेकायदेशीर उद्देशाने खरेदी केल्या जाणार नाहीत, याबाबत आवश्यक खबरदा री घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
- तसेच लिलावानंतर गाईंची वाहतूक करताना लागू असले ल्या कायदे व नियमांचे काटेकोर पालन होत आहे की ना ही, याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- गाईंच्या सुरक्षिततेसाठी योग्य व्यवस्था करावी आणि को णतीही बेकायदेशीर कृती होऊ नये यासाठी आवश्यक प्र तिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
- गरज भासल्यास पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागा शी समन्वय साधून कारवाई करावी, अशी मागणी निवेद नातून करण्यात आली आहे.
- “गाईंच्या संरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील असून,नग रपंचायतीने या प्रकरणात तातडीने योग्य ती कायदेशीर व प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी,” अशी मागणी युवासे ना,अहेरी विधानसभा संपर्क प्रमुख सचिन येरोजवार यांनी केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






