मॉडर्न इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांना पाठवल्या राख्या.

  • प्रतिनीधी : शिवाजी अंबिके :- देशाच्या सीमेवर अहोरा त्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्य क्त करण्यासाठी मॉडर्न इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक, मा ध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘एक राखी जवानांसाठी’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले.
  • रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले ल्या आकर्षक राख्या आणि प्रेमाचा संदेश सीमेवरील ज वानांसाठी पाठविला.
  • या सर्व राख्या भारतीय संस्कृती सं वर्धन संस्थेचे कार्यवाह डॉ.नंदकिशोर एकबोटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
  • यावेळी डिफेन्स फोर्स लीगचे अध्यक्ष रघुनाथ सावंत,सेवा निवृत्त सैनिक दत्ता साबळे,सुखदेव खेडकर माध्यमिक वि भाग मुख्याध्यापिका गौरी सावंत,प्राथमिक विभाग मुख्या ध्यापिका तृप्ती वंजारे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
  • ‘देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांनाही आपलेपणाची आ णि प्रेमाची जाणीव व्हावी’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी मो ठ्या उत्साहाने राख्या तयार केल्या.
  • प्रत्येक राखीसोबत जवानांना शुभेच्छा व आभार व्यक्त करणारे संदेशही लिहिण्यात आले.
  • या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधि लकी आणि सैनिकांविषयी आदराची भावना रुजविण्या चा प्रयत्न करण्यात आला.
  • जवान आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सुरक्षेसा ठी सेवा बजावत असतात. त्यामुळे त्यांच्या त्यागाची जा णीव विद्यार्थ्यांना व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्दे श होता.
  • विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या व सोबत विद्यार्थ्यानी स्वतः पत्रं लिहून सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाठविण्यात आल्या.
  • या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून कौतु क होत असून, ‘जवानांच्या मनगटावर राखी, विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती’ असा भावनिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
  • उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह डॉ.ज्यो त्स्ना एकबोटे,उपकार्यवाह डॉ.निवेदिता एकबोटे,शाळेचे व्हिजिटर डॉ.अतुल फाटक,डॉ.शशिकांत ढोले यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles